Saturday, April 27, 2024
Homeनगरसपना ढगे ठरली साखर उद्योगातील पहिली महिला अधिकारी

सपना ढगे ठरली साखर उद्योगातील पहिली महिला अधिकारी

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newsas

सपना ढगे ही पुरुषांचीच मक्तेदारी असलेल्या महाराष्ट्रातील साखर कारखानदारीत नवा अध्याय घडवणारी महिला अधिकारी ठरली आहे.

- Advertisement -

पुणे जिल्ह्यातील भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची कामगार कल्याण अधिकारी म्हणून सपना सुरेश ढगे ही मुलगी रुजू होत आहे. तीस वर्षापासून घरोघरी वर्तमानपत्रे टाकून वाचकांना शिक्षित करणाऱ्या व त्यावरच उदरनिर्वाह करणाऱ्या बापाने एक सुशिक्षित स्वप्न पाहिले. फक्त मुलीला जन्म द्यायचा आणि त्यांना खरोखरच त्याला मुलगी झाली. त्याने त्यानं एका मुलीवरच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली. म्हणून त्या काळी त्याची खूप चर्चाही झाली. मात्र त्यानं एक स्वप्न ठरवलं होतं ते आपली वंशाची पणती नक्कीच पूर्ण करेल असा विश्वासही त्याला होता. त्यासाठी तिच्या पंखात आत्मविश्वासाचं बळ देत त्यानं तिचं नावच मुळी सपना ठेवलं.

27 वर्षानंतर ही सपना महाराष्ट्रातील साखर कारखानदारीत नवा अध्याय घडवणारी महिला अधिकारी ठरली आहे. भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची कामगार कल्याण अधिकारी म्हणून सपना सुरेश ढगे ही मुलगी येत्या दोन दिवसांत कामास सुरवात करेल. तिने हा एक पराक्रम केला आहे. राज्याच्या साखर कारखानदारीतील पुरूषी मक्तेदारीला छेद देत पहिली महिला कामगार कल्याण अधिकारी बनण्याची कामगिरी तिने केली आहे .

काही दिवसांपूर्वी छत्रपती कारखान्यात कार्यकारी संचालकांसह विविध पदांसाठी मुलाखती झाल्या. त्यामध्ये कामगार कल्याण अधिकारी पदासाठी अनेकजणांनी मुलाखत दिली. मात्र त्यामध्ये सपना हिने टाकलेला प्रभाव सर्वांनाच स्तिमीत करून गेला. तिने आयटी कंपनीत यापूर्वी मनुष्यबळ अधिकारी म्हणून काम केले असल्याने तिला मुलाखतकारांची एकमताने पसंती मिळाली आणि तिचे नाव साखर कारखानदारीत निश्चित झाले.

मी शिकले, मात्र आत्मनिर्भर करण्याचे काम मात्र माझ्या आईवडीलांनी केले. मी जिथे काम केले, तिथे प्रामाणिकपणे केले. आताही जिथे काम करेल, तिथे प्रामाणिकपणेच करीन. माझ्या आईवडीलांनी 27 वर्षापूर्वी जे ध्येय ठेवले होते, ते ध्येय पूर्ण करण्याबरोबरच ज्या क्षेत्राची मी निवड केली आहे. तिथे महिलांवर ठेवलेला विश्वास सार्थ होतो हे सिध्द करण्यासाठी व संस्थेची प्रगती होण्यावरच माझा भर राहील.

सपना ढगे

- Advertisment -

ताज्या बातम्या