Sunday, April 28, 2024
Homeजळगावसोयगाव तालुक्यात सहा तास संततधार

सोयगाव तालुक्यात सहा तास संततधार

सोयगाव,Soygaon

सोयगाव शहरासह तालुक्यात शनिवारी रात्री व रविवारी पहाटे सहा तास (six hours) संततधार (Santadhar) पावसाने (Rain) हाहाकार घातला होता. या पावसात ऐन हाताशी आलेला पिकांचा (Crops) घास निसर्गाच्या अस्मानी संकटात हिरावून घेतला या पावसात कपाशी पिकांच्या फुल पात्या व कैऱ्या गळून पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान (loss to farmers) झाले आहे. सोयगाव (वेताळ वाडी) जरंडी (धिंगापूर) ही दोन धरणे ओव्हरफलो (Dam overflow) झाली आहे.

- Advertisement -

सोयगाव सह तालुक्यात शनिवारी व रविवारी कमी अधिक जोर धरत पावसाने हजेरी लावली यामध्ये फुलपात्यां वर आलेली कपाशी,ज्वारी,बाजरी,मका,आणि सोयाबीन या पिकांचे नुकसान झाले आहे.

सोयगाव सह तालुक्यात झालेल्या संततधार पावसा मुळे सोयगाव (वेताळवाडी) आणि जरंडी हे दोन्ही धरणे ओव्हरफलो झाली असल्याने सोयगावची सोना नदी दुथडी भरून वाहू लागली होती. झालेल्या संततधार पावसाने सोयगाव-बनोटी रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्यामुळे या रस्त्यावरून वाहतुकीची कोंडी झाली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या