Thursday, April 25, 2024
Homeनगरसंत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त श्रीरामपुरात भव्य मिरवणूक

संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त श्रीरामपुरात भव्य मिरवणूक

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या 726 व्या पुण्यतिथीनिमित्त संत सावता प्रतिष्ठान व माळी समाज बांधवाच्यावतीने श्रीरामपूर शहरातून सावता महाराज प्रतिमेची सजविलेल्या रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

- Advertisement -

मिरवणुकीत रथ, ट्रॅक्टर व ट्रॉली फुलांनी सजवून त्यात ग्रंथराज ज्ञानेश्वरी व श्री संत सावता महाराज यांची प्रतिमा तसेच महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, श्री संत सावता महाराज यांची वेशभूषा केलेले शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी, तसेच महिलांनी तुळशी वृंदावन डोक्यावर घेत पारंपरिक संबळ वाद्य, भजनी मंडळ व टाळ-मृदुंगाच्या गजरात व पुंडलिक वरदा हरि विठ्ठल..,श्री ज्ञानदेव तुकाराम, सावता महाराज की जय असा गजर, चौका चौकात फटाक्याची आतिषबाजी करत महिला व पुरुषांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सावता महाराज मंदिर आकर्षक फुल-हारांनी सजविण्यात आले होते.

पुण्यतिथीनिमित्त सावता महाराज मंदिरात 7 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहास 20 जुलै रोजी भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात सुरुवात झाली. श्री सावता महाराज मंदिरात दिनानाथ (आप्पा) गिरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताह सोहळा सुरू होता. श्री कावले महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने सोहळ्याची सांगता झाली.

सावता मंदिरात सकाळी मूर्तीस स्नान घालून पूजा करण्यात आली. यावेळी सजविलेल्या रथात संत सावता महाराजांची प्रतिमा ठेऊन मान्यवरांच्याहस्ते पूजा व आरती करण्यात आली. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. 20 जुलै ते 27 जुलै या कालावधीत रोज पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी व रात्री भजनाचा कार्यक्रम आदी धार्मिक कार्यक्रम झाले. शिक्षक श्री कुर्‍हे यांच्या मार्गदर्शनाखालील पटेल हायस्कूलचे लेझीम पथक, भामाठाणच्या विद्यार्थ्यांचे टाळ -मृदंग पथक,बेलापूरचा ढोलीबाजा, अश्वावर अरुढ महिला व आकर्षक रथ या मिरवणुकीचे आकर्षण ठरले.

मिरवणुकीत माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, शिर्डी संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे, अशोकचे माजी संचालक जालिंदर कुर्‍हे, शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे, दैनिक सार्वमतचे वृत्तसंपादक अशोक गाडेकर सहभागी झाले होते.

कार्यक्रमासाठी सावता प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयराव कुदळे, कार्याध्यक्ष माजी नगरसेवक दत्तात्रय साबळे, दीनानाथ गिरमे यांच्या मागर्दनाखाली विवेक गिरमे, शशांक रासकर, देविदास शिरसाठ, रवींद्र कळमकर, सुनील ससाणे, अशोक सोनवणे, जितू शिंदे, सुरेश गिरमे, तेजस बोरावके, रणजीत गिरमे, शरद कळमकर, उदय क्षीरसागर, पत्रकार भाऊसाहेब जाधव, गौरव गिरमे, आरोग्यमित्र सुभाषराव गायकवाड, सुनील अनाप, अविनाश कुदळे, बी. एम, पुजारी, किरण बोरावके, डॉ. राजेंद्र लोंढे, प्रकाश कुर्‍हे, अर्जुन कुर्‍हे, सुरेश कुर्‍हे, बाजीराव वैद्य, कृष्णा पुंड, प्रशांत गिरमे, संजय मेहेत्रे, आबा रोकडे, देविदास शिरसाठ, सनी डोखे, सागर भोंगळे, नरेंद्र कुर्‍हे, विलास पुंड, प्रमोद आगरकर, नवनाथ जेजुरकर, दिलीप आगरकर, विशाल शेरकर, दिलीप जगताप, कृष्णा आगरकर, संजय दुधाळ, दिनेश तरटे, क्रांतीज्योती महिला मंडळाच्या अध्यक्षा उषा गाडेकर, मंगल जगताप, अर्चना गिरमे यांच्यासह माळी समाज बंधू- भगिनी यांनी परिश्रम घेतले.

मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत

मिरवणुकी दरम्यान नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी गणेश शिंदे व स्वाती पुरे, राममंदीर चौकात संजय कासलीवाल, राजेंद्र पाटणी, गुलाब झांजरी, महावीर पाटणी, महावीर काला, मयूर पाटणी, जितेंद्र कासलीवाल तर राम मंदिर ट्रस्टतर्फे अध्यक्षा प्रणितीताई गिरमे, गुरू प्रदीप वाडेकर, सौ. वाडेकर यांनी मिरवणुकीचे स्वागत केले. श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतिष गोरे, पो. हे. कॉ. सोमनाथ गाडेकर, श्री. शेलार, गिरमे चौकात सिद्धार्थ गिरमे, पत्रकार अनिल पांडे, अ‍ॅड. सुहास चुडीवाल आदींनी स्वागत केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या