Friday, April 26, 2024
Homeनाशिकश्री निवृत्तीनाथ मंदिर विश्वस्त नियुक्तीसाठी उद्यापासुन मुलाखत

श्री निवृत्तीनाथ मंदिर विश्वस्त नियुक्तीसाठी उद्यापासुन मुलाखत

नाशिक । Nashik

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येेथील प्रसिध्द श्री निवृत्ती महाराज समाधी संस्थानच्या विश्वस्तांच्या 13 पैकी 9 विश्वस्त पदाच्या मुलाखती उद्या (दि.28)पासुन होणार आहे. ही प्रक्रीया धर्मदाय उपआयुक्त कांचनगंगा सुपाते – जाधव यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येेथील प्रसिध्द श्री निवृत्ती महाराज समाधी संस्थानच्या 9 विश्वस्तांची निवड प्रक्रीया नुकतीच नाशिक धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत सुरु करण्यात आली आहे.

यात विश्वस्त पदाकरिता हिंदु व्यक्ती, वारकरी संप्रादायाशी जोडलेली व्यक्त व नाशिकचा रहिवाशी अशा अटी आहे. यानुसार या पदावर इच्छुक असलेल्या व्यक्तींना 17 डिसेंबरपर्यत अर्ज सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. या मुदतीत जिल्ह्यातील 187 जणांनी अर्ज सादर केले आहे.

या इच्छुकांच्या सोमवार (दि.28) पासुन मुलाखती घेतल्या जाणार असुन या मुलाखती धर्मदाय उपआयुक्त कांचनगंगा सुपाते – जाधव या घेणार आहे. या प्रक्रियेनंतर 9 नावे अंतीम केली जाणार असुन ती 12 जानेवारीनंतर या त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केला जाणार आहे.

या पदावर जाण्यासाठी जिल्ह्यातील वारकरी संप्रादायातील मान्यवर, विविध संस्थावर कार्यरत असलेले मान्यवर, विविध क्षेत्रातील मान्यवर यादी अर्ज दाखल केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या