Friday, April 26, 2024
Homeनगरवादग्रस्त विश्वस्त स्वतःहून राजीनामा देणार

वादग्रस्त विश्वस्त स्वतःहून राजीनामा देणार

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिराचे वादग्रस्त ठरलेले विश्वस्त देशमुख महाराज हे स्वतःहून राजीनामा देणार असल्याचे संस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी काल जाहीर केले. नेवासा वकील संघटनेने या संदर्भात मोर्चा काढून देवस्थान अध्यक्षांना निवेदन दिले.

- Advertisement -

वकील संघटना व भक्त मंडळाने नेवासा बसस्थानक येथून थेट संत ज्ञानेश्वर मंदिरावर मोर्चा काढला. महाराजांची हकालपट्टी झालीच पाहिजे आशा घोषणा देत होते व तशा आशयायचे फलकही हात धरले होते.

नेवासा तालुका वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. कैलास कापसे, जिल्हा प्रॅक्टिशनर बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब गरड, पोपटराव आघाव, डॉ. अजिनाथ गुडध्ये यांनी नेतृत्व केले. यावेळी अ‍ॅड. आण्णासाहेब अंबाडे, अ‍ॅड. बन्सी सातपुते, अ‍ॅड. कारभारी वाखुरे, पोपट आघाव, डॉ. गुडधे, धनू काळे यांनी भावना व्यक्त केल्या. यामध्ये महाराज वारकर्‍यांशी उद्धटपणे बोलतात, पारायण सोहळ्यांमध्ये स्वतःची वर्णी लावण्यावरून भांडण करतात तसेच भाविकांना पैसे मागतात असे आरोप करण्यात आले. यामुळे मंदिराचे पावित्र्य भंग पावत असल्याने त्यांना मंदिरातून हटवावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

निवेदन स्वीकारल्यानंतर संस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग म्हणाले की सदर विश्वस्त महाराजांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. वकील संघ व भक्तांच्या भावनांची विश्वस्त मंडळाने दखल घेतली असून कारवाई अंतर्गत महाराजांना खुलासा मागविण्यात आला आहे. त्यांची मंदिरातील कीर्तन सेवा रद्द करण्यात आली आहे. यानंतरही वकील संघाने महाराज मंदिरात दिसल्यास महाराजांच्या खोलीला टाळे ठोकू व महाराज येथून जाईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले. पसायदानाने मोर्चाची सांगता झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या