Friday, April 26, 2024
Homeनगरव्यक्ती एक प्रभार अनेक; संजीवन दिवेंकडे चार पदांचा चार्ज

व्यक्ती एक प्रभार अनेक; संजीवन दिवेंकडे चार पदांचा चार्ज

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

राज्य शासनाच्या अनेक कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचार्‍यांची कमतरता भासत असून त्याचा परिणाम म्हणून एका व्यक्तीकडे चार चार पदांचा

- Advertisement -

चार्ज देण्याची वेळ शासनावर आली आहे. यात श्रीरामपूर पंचायत समिती मधील शिक्षण विभागाचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे यांच्याकडेही चार पदाचा चार्ज देण्यात आला आहे.

श्री. दिवे यांची मूळ नेमणूक शिक्षण विभागात शिक्षण विस्ताराधिकारी म्हणून आहे. शिक्षण विभागाला शालेय पोषण अधीक्षक नसल्याने तो ही चार्ज त्यांच्याकडे देण्यात आला. त्यानंतर शासनाच्या धोरणानुसार मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर सरकारी कर्मचार्‍यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली गेल्याने खोकर ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली.

आता श्रीरामपूर पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकार्‍यांची बदली झाल्याने तालुक्याच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदाचा चार्ज देखील त्यांच्याकडे देण्यात आला आहे. गटशिक्षणाधिकारी, शालेय पोषण अधीक्षक, शिक्षण विस्तार अधिकारी आणि ग्रामपंचायत प्रशासक अशा चार पदांवर ते सध्या कार्य करीत असून एका व्यक्तीकडे चार पदांचा चार्ज असण्याचे महाराष्ट्रातील हे पहिलेच उदाहरण आहे.

संजीवन दिवे यांनी शिक्षण खात्यांमध्ये काम करताना आपल्या मनमिळावू स्वभावाने माणसं जोडण्याचे काम केले असून एक कार्यतत्पर अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळेच त्यांच्याकडे विविध पदांचा चार्ज शासनाने सोपविला असल्याची चर्चा जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळामध्ये होत आहे. सध्या ते दररोज अठरा तास काम करून आपल्याकडे आलेली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या