Wednesday, April 24, 2024
Homeनगरकरोना लस नोंदणीसाठी संजीवनी ई बस गावोगावी

करोना लस नोंदणीसाठी संजीवनी ई बस गावोगावी

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

करोनाच्या वैश्विक महामारी संकटाने संपूर्ण जगाला तब्बल वर्षभर वेठीस धरले. कोणावर काय संकटे आली हे सर्वश्रुत आहे.

- Advertisement -

आता करोना लस बाजारात आल्याने थोडासा धिर सर्वांनाच मिळाला आहे. परंतु खेडोपाडीच्या वृध्द व्यक्तींना तसेच इतरही ज्यांना इतर आजारांनी ग्रासले आहे, अशांपर्यंत ही लस कधी पोहचणार, कारण लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. खेडोपाडीच्या लोकांकडे त्यासाठी अँड्रॉईड फोन असेलच असे नाही.

हे सर्व प्रश्न डोळ्यासमोर ठेवून घरातील सर्व कोल्हे कुटुंबियांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते व संजीवनी फाउंडेशनचे सचिव सुमित कोल्हे यांनी संजीवनी फाउंडेशनची ई बस खेडोपाडी पाठवून अशा व्यक्तींची करोना लसीकरणासाठी नाव नोंदणी अभियान दि. 13 मार्चपासून सुरू केले आहे.

या उपक्रमाची सुरूवात ब्राम्हणगाव येथून झाली असून पहिल्याच दिवशी 150 व्यक्तींची नाव नोंदणी झाली आहे. ही लस विनामूल्य देण्यात येणार असून नोंदणीकृत व्यक्तींना लसी करणासाठी कोठे व कधी जायचे, याचेही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

संजीवनी फाउंडेशनद्वारे कोव्हिड 19 च्या संवेदनशिल सुरूवातीच्या काळात अन्नदान, स्थलांतरीत कामगारांसाठी प्रवासाची सोय, औषधे, किराणा, भाजीपाला, अर्सेनिक अल्बम गोळ्या इत्यादींचे वाटप, रोजगार मेळावा, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण असे अनेक उपक्रम राबवून शक्य तितक्या गरजुंना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

परंतु करोनाचा कहर पुन्हा वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सुमित कोल्हे यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून त्याऐवजी वृक्ष लागवड, शैक्षणिक साहित्याचे गरजू विद्यार्थ्यांना वाटप व विशेष म्हणजे करोना लसीकरणासाठी गरजुंच्या नाव नोंदणी अभियानात तरुणांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या