Thursday, April 25, 2024
Homeराजकीयकाँग्रेसला संपवण्यासाठी पवारांना युपीए अध्यक्ष करण्याची चर्चा

काँग्रेसला संपवण्यासाठी पवारांना युपीए अध्यक्ष करण्याची चर्चा

नवी दिल्ली –

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे युपीए चे अध्यक्ष होणार अशी चर्चा म्हणजे काँग्रेसला संपवण्याचा मोठा कट सुरु असल्याचा आरोप काँग्रेसचे

- Advertisement -

ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी केला आहे. इतकंच नाही तर शरद पवार यांना युपीए अध्यक्ष करण्याची चर्चा हा राहुल गांधींविरोधातील मोहिमेचा भाग असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

संजय निरुपम यांनी ट्विट करत म्हटलं आहे, ‘दिल्लीपासून मुंबईपर्यंत राहुल गांधींविरोधात एक मोहिम सुरु असून शरद पवार यांना युपीए अध्यक्ष करण्याची चर्चा हा त्याचाच एक भाग आहे. याच मोहिमेअंतर्गत 23 स्वाक्षर्‍या असणारी चिठ्टी लिहिण्यात आली होती. यानंतर राहुल गांधींच्या नेतृत्वात सुसंगततेची कमतरता शोधण्यात आली. काँग्रेसला संपवण्याचा एक मोठा कट आहे.’

शरद पवार यांनी फेटाळलं वृत्त –

युपीए अध्यक्षपदाबाबतच्या चर्चेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. या चर्चामध्ये काही तथ्य नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या