Wednesday, April 24, 2024
Homeनगरस्वच्छता कर्मचार्‍यांच्या वसाहतीसाठी प्रस्ताव तयार करा

स्वच्छता कर्मचार्‍यांच्या वसाहतीसाठी प्रस्ताव तयार करा

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांच्या वसाहतीची झालेली दुरवस्था पाहून ना. आशुतोष काळे यांनी तातडीने स्वच्छता कर्मचार्‍यांच्या 100 फ्लॅटच्या वसाहतीसाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिल्या आहेत.

- Advertisement -

श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी नुकतीच कोपरगाव शहरातील नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांच्या वसाहतीची पाहणी केली. त्यावेळी वसाहतीच्या झालेल्या दुरवस्थेमुळे सदर कर्मचार्‍यांना येत असलेल्या अडचणीची त्यांनी गांभीर्याने दखल घेऊन या कर्मचार्‍यांसाठी 100 फ्लॅटची वसाहत तयार करण्यासाठी प्रस्ताव तयार करा अशा सूचना मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिल्या.

मागील अनेक वर्षांपासून स्वच्छता कर्मचार्‍यांच्या वसाहतीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या वसाहतीची अत्यंत वाईट अवस्था झाल्यामुळे वसाहतीमध्ये राहणार्‍या स्वच्छता कर्मचार्‍यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. याबाबत त्यांनी ना.आशुतोष काळे यांच्याकडे आपल्या अडचणी मांडल्या होत्या. त्याची दखल घेऊन त्यांनी नुकतीच स्वच्छता कर्मचारी राहत असलेल्या परिसराची पाहणी केली. यावेळी वसाहतीची झालेली दुरवस्था पाहून त्यांनी तातडीने नवीन वसाहतीसाठी प्रस्ताव तयार करण्यास सांगितले. नगरविकास विभागाकडून सर्व सोयींनी युक्त 100 फ्लॅटची सुसज्ज वसाहत उभारण्यासाठी आपण जातीने लक्ष घालणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, आरोग्य अधिकारी सुनील आरण, रवी दिनकर, केवल हाडा, केदु निरभवणे, रणजित तोळे, भरत साबळे, कमलजीत लाटे, मधुकर वालेकर, पवन हाडा, सागर साबळे, निलेश साबळे, रोहित डाके, कमलेश साबळे, राजेश भुजारे, देवेंद्र डाके, सनी लोंढे, सावन निरभवणे, योगेश साळवे, आनंद वाल्हेकर, अमोल लोखंडे, सतीश साबळे, राघू लोंढे, रोहित डाके, अजय हाडा, अमोल दिनकर आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या