Thursday, April 25, 2024
Homeनगरशहरांमध्ये 1 मार्चपासून स्वच्छता अभियान

शहरांमध्ये 1 मार्चपासून स्वच्छता अभियान

पालिका, नगरपंचायतींनी केलेल्या कामांचे मुल्यमापन होणार

अहमदनगर (प्रतिनिधी) –1 मे 2020 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हीरक महोत्सव साजरा होत असून या निमित्ताने स्वच्छ, सुंदर व हरीत महाराष्ट्राची संकल्पना साकारण्यासाठी दि. 1 मार्च ते 30 एप्रिल 2020 या कालावधीत राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हीरक महोत्सवी नागरी महाराष्ट्र स्वच्छता अभियान राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

- Advertisement -

यात शहरातील घनकचर्‍याचे व्यवस्थापन करणे, शहरात निर्माण होणार्‍या घनकचर्‍याचे 100 टक्के संकलन करणे, घनकचर्‍याचे विलगीकरणचे प्रमाण वाढविणे, विलगीकृत घनकचर्‍यावर 100 टक्के प्रक्रिया करणे, रस्त्यांची सुधारणा व सौंदर्यीकरण, पथदिवे, वाहतूक बेटे दुभाजकांचे सौंदर्यीकरण, उड्डाण पुलाच सौंदर्यीकरण, शहरातील नाल्यांची सफाई करणे, सर्वसाधारण स्वच्छता, विविध जाहीरत फलक हटविणे, फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी, उद्यानांचे सौंदर्यीकरण, संबंधित शहरांसाठी समान वैशिष्टपूर्ण डिझाईन तयार करणे यासह अन्य कामांचा समावेश आहे.

या सूचनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याची जबाबदारी संबंधित आयुक्त, मुख्याधिकार्‍यांची राहिल. या अभियानात संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने केलेल्या कामाचे मुल्यमापन 1 मे 2020 नंतर राज्य शासन नियुक्त केलेल्या त्रयस्थ यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे. त्याचा निकाल जून 2020 मध्ये जाहीर करण्यात येईल. चांगली कामगिरी करणार्‍यांना बक्षिसे देण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या