संग्रामसिंह निशानदार नाशिकचे नवे पाेलीस उपायुक्त; पाेैर्णिमा चाैगुले यांची बदली

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहर पाेलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेचे पाेलीस उपायुक्त म्हणून मुंबईतील झाेन एकचे उपायुक्त संग्रामसिंह निशानदार यांना जबाबदारी देण्यात आली आहे. अभियांत्रिकीत युनिव्हर्सिटी रँकर असलेले संग्रामसिंह यांचे शिक्षण नाशिकमधील सेंट झेविअर हायस्कूलमधून झाले अाहे.

राज्याच्या गृह विभागाने नुकत्याच राज्यातील भारतीय पाेलीस सेवा व राज्य पाेलीस सेवेतील वरिष्ठ पाेलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

विशेष म्हणजे राज्यातील १६ आधिकाऱ्यांना आयपीएसचे प्रमाेशनही मिळाले आहे. नाशिक शहर पाेलीस आयुक्तालयात गुन्हे व विशेष शाखेच्या उपायुक्त असलेल्या पाेैर्णिमा चाैगुले- श्रींगी यांची बदली करण्यात आली आहे.

त्यांना अद्याप पदस्थापना देण्यात आली नसून सध्या वेटींगवर आहेत. यासोबतच भद्रकालीे पाेलीस ठाण्याचे तत्कालीन वरीष्ठ पाेलीस निरीक्षक व अमरावती ग्रामिणच्या चांदूर रेल्वे विभागाचे उपविभागीय पाेलीस आधिकारी (एसडीपीआे) साेमनाथ तांबे यांची नाशिक ग्रामिण पाेलीस दलाच्या निफाड विभागाचे उपविभागीय पाेलीस अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. यासाेबतच

महाराष्ट्र पाेलीस अकादमीतील पाेलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांची बदली मालेगावच्या अप्पर पाेलीस अधिक्षकपदी करण्यात अाली आहे. तर परभणी ग्रामिणचे एसडीपीआे अमाेल गायकवाड हे नाशिक ग्रामिणच्या कळवण उपविभागाचे नवे उपविभागीय पाेलीस आधिकारी

म्हणूण कारभार पाहणार आहेत. साेबतच अकाेला येथील मूर्तिजापूरचे एसडीपीआे डाॅ. अर्जुन भाेसले हे नाशिक ग्रामिण उपविभागाचे एसडीपीआे असतील.

पाेलीस आयुक्तालयाला चार नवे एसीपी

नाशिक शहर पाेलीस आयुक्तालयात नव्याने चार सहाय्यक पाेलीस अायुक्त (एसीपी) दाखल हाेणार आहेत. यात नाशिक एमपीएमध्ये सहाय्यक संचालक असलेले मोहन ठाकूर, पुणे ग्रामिणच्या जुन्नर उपविभागाच्या एसडीपीओ दिपाली खन्ना, नंदूरबार ग्रामिण पाेलीस मुख्यालयाचे उपअधिक्षक सीताराम गायकवाड व अमरावती ग्रामिणच्या फेझरपुरा विभागाचे एसडीपीओ शेख सोहेल नूरमोहम्मद या चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

नाशिक शहरातील २०० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या

शहर पाेलीस दलातील सहाय्यक पाेलीस उपनिरीक्षक, शिपाई, नाईक यांच्यासह अन्य पाेलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश नवनियुक्त पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांनी काढले आहेत.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *