Thursday, April 25, 2024
Homeनगरसंगमनेर तहसीलदारांच्या वाहनाचे कोतवाल करतोय सारथ्य

संगमनेर तहसीलदारांच्या वाहनाचे कोतवाल करतोय सारथ्य

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

संगमनेर तहसील कार्यालयातील तहसीलदारांचे वाहन चालविण्यासाठी तब्बल 2 वर्षांपासून वाहनचालकच नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. वाहनचालकाची नियुक्ती होत नसल्याने कोतवाल म्हणून कार्यरत असलेली व्यक्तीच तहसीलदारांचे वाहन चालवत आहे.

- Advertisement -

तहसीलदारांना संपूर्ण तालुक्याची जबाबदारी असते. यामुळे त्यांना सातत्याने दौरे करावे लागतात. यासाठी शासनाने तहसीलदारांना स्वतंत्र वाहन व वाहनचालक दिलेला असतो. संगमनेरातही 2 वर्षांपूर्वी असा वाहनचालक कार्यरत होता मात्र गेल्या 2 वर्षांहून अधिक कालावधीपासून संगमनेर तहसील कार्यालयात अधिकृत वाहनचालकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

वाहनचालकच नसल्याने तालुक्याचे दौरे कसे करायचे असा प्रश्न तहसीलदारांसमोर निर्माण व्हायला पाहिजे होता मात्र असा कोणतीही प्रश्नच नसल्याने तहसीलदारांचे काम वरच्यावर होत आहे.

तहसीलदारांनी वाहन चालविण्याची जबाबदारी एका कोतवालावर सोपवली आहे. हा कोतवाल वाहन चालविण्यात तरबेज असल्याने गेल्या 2 वर्षांपासून तोच तहसीलदारांच्या वाहनाचे सारथ्य करीत आहे. कोतवालाचे काम वेगळे असते त्याला त्या कामाचा पगारही मिळत असतो.

तहसीलदारांचे वाहन चालविण्याची जबाबदारी व अधिकारही नसताना हा कोतवाल तहसीलदारांचे वाहन चालवतोच कसा? असा सवाल उपस्थित केला जात आहे. हा कोतवाल वाहन चालविण्याचे काम करतो तर त्याचे काम कोण करते, बेकायदेशीर वाहन चालविले जात असतानाही वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष का देत नाही असा सवालही आता विचारला जाऊ लागला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातून संगमनेर तहसील कार्यालयात वाहन चालकाची नियुक्ती का केली जात नाही? एखादा महत्त्वाचा दौरा असल्यावर तहसीलदारांनी वाहन चालकाशिवाय वाहन कसे चालवाये असे अनेक प्रश्न असतानाही याकडे वरिष्ठांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे.

तहसीलदारांप्रमाणेच प्रांतधिकार्‍यांचे वाहनही अनेकदा दुसर्‍या कोतवालानेच चालविली असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी या प्रश्नात लक्ष घालून कायमस्वरूपी वाहन चालकांची नियुक्ती करण्याची गरज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या