Thursday, April 25, 2024
Homeनगरपुणे, मुंबईच्या धरतीवर संगमनेरात सोशल क्लब जोमात

पुणे, मुंबईच्या धरतीवर संगमनेरात सोशल क्लब जोमात

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

करोना महामारीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असतांना शहरात जुगार अड्डे खुलेआम सुरू आहेत.

- Advertisement -

हे अवैध धदे जोमात सुरू असतानाच शहरात पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरांत चालणारा सोशल क्लबही जोरात सुरू झाला आहे. या क्लबमुळे अनेकजण आहारी जाणार असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. असे क्लब कोणाच्या आशिर्वादामुळे सुरू झाले आहेत, असा संतप्त सवालही नागरिकांमधून विचारला जात असून या क्लबवर निर्बंध आणण्यात यावेत,अशी मागणी होत आहे.

संगमनेर शहरामध्ये दोन ते अडीच वर्षापूर्वी एका सोशल क्लबला परवानगी दिली होती. सोशल क्लब चालकाला कोल्हापूरचे लायसन्स मिळाले होते. मात्र ते लायसन्स कोल्हापुरपर्यंतच मर्यादित होते. काही क्लब चालकांनी या सोशल क्लबचे लायसन्स कोल्हापूरचे दाखवून संगमनेरात चालू केले होते. या सोशल क्लबच्या लायसन्सला जिल्हाधिकार्‍यांची परवानगी लागते. मात्र संगमनेरात दोन दिवसांपासून सोशल क्लबवाल्यांनी डोके वर काढले आहे.

सोशल क्लब चालविण्याची पध्दत वेगळ्या स्वरुपाची असते. एका मोठ्या हॉलमध्ये चार ते पाच टेबल लावण्याची परवानगी दिली जाते. याठिकाणी पैसे न लावता टोकन दिले जाते. त्यानंतर पुढील खेळ सुरू होतो. सोशल क्लबमध्ये जेवणाची सुध्दा व्यवस्था केली जाते. हा सोशल क्लब मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर या मोठमोठ्या शहरांमध्ये चालत असतो.

या जुगाराशी व सोशल क्लबशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसतानाही काहीजणांनी सोशल क्लबला परवानगी घेतल्याचे समजते. शहरातील काही जुगार्‍यांनी सोशल क्लब चालू केला होता. त्यांची कागदपत्र नियमबाह्य होती. त्यामुळे हा सोशल क्लब एका वरिष्ठ अधिकार्‍यांनी तो त्वरीत बंद केला होता. सोशल क्लबमुळे शहरात जुगारधंद्यांवाल्यांना स्पर्धक तयार झाल्याचे दिसत आहे.

हा सोशल क्लब गरिबांना परवडणारा नाही. शहरातील काही जुगारधंद्यावाल्यांना या सोशल क्लब चालकांनी फोन करून आमच्यासोबत भागीदारीत व्यवसाय करणार का? असे विचारले असल्याचे बोलले जात आहे. शहरात जे सोशल क्लब चालू होत आहे त्यांना जिल्हाधिकार्‍यांची परवानगी आहे का? या सोशल क्लबमध्ये सीसीटीव्ही देखील लावलेले असतात. मात्र संगमनेरात सोशल क्लबमुळे वातावरण खराब होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कायदा व सुव्यवस्था देखील या सोशल क्लबमुळे धोक्यात येऊ शकते. दोन वर्षांपासून जो सोशल क्लब बंद होता. अधिकार्‍यांना त्या क्लबला परवानगी देण्याची गरज काय? बाहेरच्या जिल्ह्यातून सोशल क्लबचे लायसन्स आणणे व ते एखाद्या शहरात चालविणे हे योग्य का? या सोशल क्लबचे कागदपत्र तपासून घेण्यात आले की नाही? याबाबतही शहरात चर्चा सुरू आहे.

या सोशल क्लबमध्ये जुगार खेळणार्‍यांना चहापाण्याची व्यवस्थाही थाटात केली जाते. त्यासाठी एका स्पेशल माणसाची नियुक्ती केली जाते. करोनाच्या कार्यकाळामध्ये सोशल क्लबला परवानगी दिली कशी? असा सवाल उपस्थित होत आहे. या क्लबमुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा सोशल क्लब त्वरीत बंद न झाल्यास काही जागृत नागरीक पोलीस अधिक्षकांची भेट घेवून हे क्लब बंद करण्याची मागणी करणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या