Friday, May 10, 2024
Homeनगरसंगमनेरात पुन्हा सव्वा दोन लाखांचा गुटखा पकडला

संगमनेरात पुन्हा सव्वा दोन लाखांचा गुटखा पकडला

संगमनेर |शहर प्रतिनिधी|Sangmner

तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोलनाक्याजवळ पोलिसांनी पुन्हा बेकायदेशीर गुटख्याची वाहतूक करणार्‍या वाहनातून

- Advertisement -

2 लाख 22 हजार 600 रुपयांचा गुटखा जप्त केल्याची घटना मंगळवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास घडली. पोलीस व अन्न औषध प्रशासनाच्यावतीने ही कारवाई करण्यात आली.

संगमनेर तालुक्यात गुटख्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. गुटखा विक्री व उत्पादनाला बंदी असतांनाही संगमनेर तालुक्यात खुलेआम गुटख्याची विक्री व वाहतूक केली जात आहे. हिवरगाव पावसा टोलनाक्याजवळ एका दुकानासमोरील मोकळ्या जागेत एका वाहनामध्ये गुटखा भरुन त्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना समजली.

अन्न व औषध प्रशासनाचे कर्मचारी व पोलीस यांनी या ठिकाणी जावून या वाहनातून 1 लाख 78 हजार 80 रुपयांचे हिरा पान मसाल्याचे 1448 पॅकेट व 44 हजार 520 रुपयांची रॉयल तंबाखूचे 1484 पाकीट पोलिसांनी जप्त केले.

अन्न व औषध प्रशासनाचे सुरक्षा अधिकारी उमेश सुर्यवंशी यानी तालुका पोलीस ठाण्यात फिर्यात दिली. संजय बाबुलाल लुंकड (वय 47 रा. घुलेवाडी) याच्या विरुध्द अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 26 (2), (4), 27 (3) (ड) 27 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आय. ए. शेख हे करत आहे. लुंकड याच्या विरोधात मागील महिन्यात गुटखा साठविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या