Friday, April 26, 2024
Homeनगरसंगमनेर तालुक्यात दोन बळी

संगमनेर तालुक्यात दोन बळी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

तालुक्यातील माळेगाव हवेली येथील एक 70 वर्षीय महिला तर वडगावपान येथील 55 वर्षीय पुरुष यांना करोनाची बाधा झाली होती.

- Advertisement -

उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यातील करोना बळींची संख्या 62 वर गेली आहे. तर काल नव्याने 43 करोना बाधित आढळून आले आहेथ.

जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये करोनाचा वेगाने फैलाव होत असून त्यात संगमनेर तालुका पहिल्या तीनमध्ये आहे. रोज रुग्णसंख्येचे विक्रमी आकडे समोर येत असल्याने तालुक्यात पुन्हा एकदा करोना सक्रिय झाला आहे. त्यामुळे शहरातील सर्व खासगी रुग्णालये तुडूंब झाली आहेत. तालुक्यातील अधिकृत मृतांचा आकडा दोनने वाढून आता 62 झाला आहे.

तालुक्यातील रुग्णवाढीची गती आजही कायम असून काल तालुक्यातील 43 जणांना करोनाची बाधा झाली आहे. शहरातील इंदिरानगर मधील 86 व 40 वर्षीय महिलांसह 18 वर्षीय तरुण, शिवाजी नगरमधील 48 वर्षीय महिला, माळीवाड्यातील 54 वर्षीय महिलेसह 22 वर्षीय तरुण, मालदाड रोडवरील 53 वर्षीय इसमासह 32 वर्षीय तरुण, 64 व 40 वर्षीय महिलेसह 15 वर्षीय मुलगी व 3 वर्षीय बालक, नवीन नगर रस्त्यावरील 33 वर्षीय तरुण, देवी गल्लीतील 69 व 53 वर्षीय इसम, गणेशनगर मधील 59 वर्षीय इसमासह 27 वर्षीय तरुण, 29 वर्षीय महिला आणि 14 वर्षीय मुलगा चैतन्यनगर मधील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, विद्यानगर मधील 42 वर्षीय तरुण, रहेमतनगर मधील 38 वर्षीय तरुण, अशोक चौकातील 53 वर्षीय महिला, जनता नगरमधील 46 वर्षीय इसम, नाशिक रोडवरील 43 वर्षीय तरुण.

ग्रामीण भागातील झोळे येथील 70 वर्षीय महिला, सायखिंडी येथील 76 वर्षीय वयोवृद्ध, निमगाव जाळी येथील 70 वर्षीय महिला, 56 वर्षीय इसम व 21 वर्षीय तरुणी, घारगाव येथील 45 वर्षीय इसमासह 40 वर्षीय महिला, पळसखेडे येथील 52 वर्षीय इसम, सुकेवाडीतील 57 वर्षीय इसम, झरेकाठी येथील 45 वर्षीय इसम, राजापूर येथील 28 वर्षीय महिला, जाखोरीतील 22 वर्षीय तरुण, संगमनेर खुर्दमधील 77 वर्षीय ज्येष्ठासह 58 वर्षीय महिला, घुलेवाडीतील 63, 60 व 32 वर्षीय महिलांसह 10 व 6 वर्षीय मुली, 62 वर्षीय ज्येष्ठासह 40, 37, 36, 34 व 33 वर्षीय तरुण, धांदरफळ बु. येथील 32 वर्षीय तरुण, गुंजाळवाडी येथील 58 वर्षीय दोघांसह 57 वर्षीय इसम व 34 वर्षीय तरुण आणि 49 वर्षीय महिलेसह 6 वर्षीय बालिका.

चंदनापुरी येथील 40 वर्षीय तरुण, निमज येथील 36 वर्षीय दोघे तरुण, खंदरमाळ येथील 36 वर्षीय महिला, निमगाव टेंभी येथील 36 वर्षीय तरुण, नांदूरी दुमाला येथील 46 वर्षीय महिला, निमगाव बु. येथील 47 वर्षीय इसम, पिंपळगाव देपा येथील 12 वर्षीय मुलगा, पिंपरी येथील 29 वर्षीय तरुण आणि जवळे कडलग येथील 68 वर्षीय महिलेसह 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक करोना बाधीत आढळले आहे. तर तालुक्याची एकूण रुग्ण संख्या 7 हजार 657 वर पोहोचली आहे.

करोना महामारी वेगाने फैलावत आहे. नागरीकांनी नियमांचे उल्लंघन केल्याने तालुका पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 1 मार्च ते 20 मार्च 2021 या दरम्यान 20 दिवसात 870 करोना बाधीत आढळून आले तर चार रुग्णांचा बळी गेला आहे. तर एकूण रुग्णसंख्या आता 7 हजार 657 झाली आहे. आजच्या स्थितीत तालुक्यातील 392 रुग्ण सक्रीय संक्रमित असून आत्तापर्यंत 62 जणांचे बळी गेले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या