Friday, April 26, 2024
Homeनगरड्युटी करण्याऐवजी शहर पोलिसांची भलत्याच ठिकाणी सेवा

ड्युटी करण्याऐवजी शहर पोलिसांची भलत्याच ठिकाणी सेवा

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

नेमून दिलेल्या ठिकाणी सेवा बजावण्याऐवजी भलत्याच ठिकाणी जाऊन शहर पोलीस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी वेगळीच

- Advertisement -

सेवा करून मेवा खात असल्याची चर्चा शहरात होत आहे. नवीन बदलून आलेल्या पोलीस निरीक्षकांनी पोलिसांच्या कारनाम्यांकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यांतर्गत शहरात बंदोबस्तासाठी वेगवेगळे फिक्स पॉईंट आहेत. याठिकाणी ड्युटीवर असलेल्या कर्मचार्‍याने त्या ठिकाणच्या कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावे असे अपेक्षीत असते. मात्र शहर पोलीस ठाण्याचा एक कर्मचारी याला अपवाद आहे. पॉईंट शहराच्या उत्तरेकडे तर सेवा दक्षिणेकडे हा कर्मचारी करताना दिसत आहे.

एका मंदिराच्या ठिकाणी पकडलेल्या रिक्षा चालकावर कारवाई करण्याऐवजी या पोलिसाने या रिक्षा चालकाला आर्थिक भुर्दंड दिल्याचे समजते. शहर पोलीस ठाण्यात यापूर्वी पोलीस निरीक्षकांचे कर्मचार्‍यांवर कुठलेही नियंत्रण नव्हते. यामुळे पोलिसांचा मनमानी कारभार सुरू होता. नव्याने पदभार घेतलेल्या पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी जोरदार कामास सुरुवात केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या