पोलीस ठाण्याच्या आवारातूनच मोटारसायकलची चोरी

jalgaon-digital
3 Min Read

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

पोलीस ठाण्याच्या आवारातूनच मोटारसायकलची चोरी (Motorcycle Theft) झाल्याची घटना तालुक्यातील घुलेवाडी येथील तालुका पोलीस ठाण्याच्या (Sangamner Taluka Police Station) आवारात घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या (Sangamner Taluka Police Station) आवारात एका गुन्ह्यातील जप्त (Seized) केलेली 25 हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची काळे रंगाची स्पलेंडर प्लस मोटारसायकल क्रमांक एम. एच 17 बी क्यू 4147 ही घुलेवाडी (Ghulewadi) येथील संगमनेर तालुका पोलिस ठाण्याच्या आवारात लावलेली होती. मयुर उर्फ भावड्या नामदेव गाडेकर (रा. जोर्वे) व अण्णासाहेब उत्तम इंगळे (रा. जोर्वे, ता. संगमनेर) या दोघांनी सदर मोटरसायकल स्वताच्या आर्थिक फायद्याकरिता लबाडीच्या इराद्याने चोरुन नेली आहे.

मोटारसायकलची चोरी (Motorcycle Theft) झाल्याची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी तालुका पोलीस ठाण्याचे सी. सी. टिव्ही चेक करुन त्या सी.सी.टिव्हीमध्ये हे दोन आरोपी गाडीची चोरी (Theft) करतांना आढळून आले. पोलिस ठाण्याच्या आवरातून गाडी कशी चोरीला जाते अशी चर्चा पोलिस ठाण्यातच रंगू लागली होती. हे दोन आरोपी तालुका पोलिस ठाण्यात येऊन एका पोलिस कर्मचार्‍यांशी अनेक वेळ गप्पा मारत होते असेही आढळून आले.

त्यानंतर हे दोनही आरोपी वरच्या रुम मधुन खाली आले आणि त्यांनी लगेचच आपला मोर्चा पोलिसांनी जप्त (Seized) केलेल्या मोटारसायकलकडे वळविला. तेथून गाडी चोरुन जोर्वेच्या दिशेने पळ काढला. ही गाडी चोरीला (Theft) गेली हि महिती कोणालाही नव्हती सदर गाडीचा मुळ मालक गाडी घेण्यासाठी तालुका पोलिस ठाण्यात आला.

तेव्हा गाडीच्या मालकाने तालुका पोलिस ठाण्यात आपली गाडी दिसत नाही म्हणून पोलिसांना विचारणा केली असता पोलिसांनी सांगितले तुमची गाडी बाहेर उभी आहे, त्यानंतर गाडीच्या मुळ मालकाने सांगितले गाडी दाखवा मग मात्र पोलिसांना समजले का पोलिस ठाण्याच्या आवरातून गाडी चोरीला गेली आहे. मुळ मालकाने पोलिस ठाण्यात चांगलाच राडा घातला. तेव्हा पोलिसांना समजले आपल्या पोलिस ठाण्यातून गाडी चोरीला गेली आहे हे असे समजल्या नंतर पोलिसांची चांगलीच धांदल उडाली.

गाडी कोणी चोरी केली याचा शोधाशोध पोलिसांनी सुरु केला. सध्याकाळी पोलिसांनी या दोनही आरोपींचा शोध घेऊन आरोपींना अटक केली. याबाबत पोलीस नाईक अनिल जाधव यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी मयूर गाडेकर व अण्णासाहेब इंगळे यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंंबर 71/2023 भारतीय दंड संहिता कलम 379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक धिंदळे हे करत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *