संगमनेर, प्रवरा व ज्ञानेश्वर कारखान्यांवर ‘अशोक’च्या अतिरिक्त उसाची जबाबदारी

jalgaon-digital
2 Min Read

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अशोक कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील अतिरिक्त उसाचे गाळप व्हावे, यासाठी संगमनेर कारखाना 15 हजार टन, प्रवरा कारखाना 15 हजार टन व ज्ञानेश्वर कारखाना 15 हजार टन असे एकूण 45 हजार टन ऊस गाळपाची जबाबदारी या तीन कारखान्यांवर टाकली असून तसे लेखी आदेशही देण्यात आल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक मिलिंद भालेराव यांनी दिली.

अशोक कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील अतिरिक्त ऊसाचे गाळप व्हावे यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कारखाना कार्यस्थळावर संबंधित शासकीय अधिकारी तसेच संचालकांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी शिल्लक उसाच्या गाळपाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.

सदरच्या आढावा बेैकीस प्रादेशिक सहसंचालक (साखर) मिलिंद भालेराव, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसिलदार प्रशांत पाटील, अधिक्षक भुमिलेख अधिकारी श्री. इंदलकर, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. माणिकराव धुमाळ यांचेसह कारखान्याचे व्हा. चेअरमन भाऊसाहेब ऊंडे, सचालक मंडाळाचे सदस्य कोंंडीराम उंडे, सोपानराव राऊत, हिंमतराव धुमाळ, युवक नेते सिध्दार्थ मुरकुटे, तज्ञ संचालिका मंजुश्री मुरकुटे, आदिनाथ झुराळे, पुंजाहरी शिंदे, विरेश गलांडे, अमोल कोकणे, कार्यकारी संचालक संंतोष देवकर, शेतकी अधिकारी नारायण चौधरी उपस्थित होते.

प्रारंभी जिल्हाधिकारी श्री. भोसले यांनी कार्यक्षेञातील शिल्लक ऊसाचा तपशील घेतला. तसेच ऊस तोडणी व गळिताबाबतचा सविस्तर आढावा घेतला. कोणत्याही परिस्थितीत शिल्लक ऊसाचे गाळप करणे आवश्यक असून त्याबाबत नियमित आढावा घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री. भोसले यांनी स्पष्ट केले.

कारखान्याचे व्हा. चेअरमन भाऊसाहेब उंडे यांनी सांगीतले की, कारखाना व्यस्थापनाने कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखाली कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी बाहेरुन हार्वेस्टर आणून ऊस तोडणी केली जात आहे. खाजगी गाव टोळ्यांमार्फतही ऊस तोडणी होत आहे. कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप करण्यासाठी व्यवस्थापन प्रयत्नशील आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आढावा बैठकीपूर्वी जिल्हाधिकार्‍यांनी ऊस तोडणी सुरु असलेल्या काही थळांना समक्ष भेट देवून पाहणी केली. यानंतर आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मंडलाधिकारी श्री. बोरुडे, तलाठी श्रीमती सोनवणे, विक्रांत भागवत, आण्णासाहेब वाकडे, शिवाजी मुठे, रमेश आढाव, बाबासाहेब तांबे, भिकचंद मुठे उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *