Tuesday, April 23, 2024
Homeनगरलाखो रुपयांच्या गुटख्याची वाहतूक करणारे दोघे अटकेत

लाखो रुपयांच्या गुटख्याची वाहतूक करणारे दोघे अटकेत

संगमनेर|प्रतिनिधी| Sangamner

राज्यात गुटखा बंदी (Gutka Banned) असतांना संगमनेरात (Sangamner) एका वाहनातून येणारा लाखो रुपयांचा गुटखा (Gutkha) संगमनेर शहर पोलिसांनी (Sangamner City Police) पकडला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

जमिल खलील शेख (वय 32) व खलील ताजमोहंमद शेख (वय 62, रा. जोर्वे रोड, संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत. सदर दोघे जण नाशिकहून (Nashik) संगमनेरात (Sangamner) एका ओमीनी कार क्रमांक एम. एच. 17 व्ही 4393 मध्ये 1 लाख 27 हजार 200 रुपयांचा हिरा पान मसाला, 31 हजार 800 रुपयांची रॉयल तंबाखू असा मुद्देमाल नाशिकच्या (Nashik) दिशेने घेवून संगमनेरात (Sangamner) येत होते. याची खबर शहर पोलिसांना मिळाली.

पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख (Police Inspector Mukund Deshmukh) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सदर वाहन घुलेवाडी शिवारात पकडले. गुटखा, तंबाखू व तीन लाख रुपये किंमतीची ओमीनी कार असा एकूण 4 लाख 59 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. प्रतिबंधित अन्न पदाथाची महाराष्ट्र राज्यात वाहतूक (Transport in the State of Maharashtra), उत्पादन, वितरण, साठा व विक्री करण्यास बंदी तसेच हे पदार्थ मानवी आरोग्यासाठी (Helth) घातक आहे, याची जाणीव असतांना हि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्याची विक्री (Sales) करण्याच्या उद्देशाने दोघे जण मिळून आले.

याबाबत पोलीस नाईक सचिन उगले यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी जमिल शेख व खलील शेख यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 504/2021 भारतीय दंड संहिता 188, 272, 273, 328 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 59(2) (iv) प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे करत आहे. सदर आरोपींना अटक (Arrested) करुन न्यायालयासमोर (Court) हजर केले असता त्यांना न्यायालयाने 29 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी (Police cell) सुनावली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या