संगमनेर : पंचायत समिती निवडणूकीसाठी आरक्षण जाहीर

jalgaon-digital
2 Min Read

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर पंचायत समितीच्या (Sangamner Panchayat Samiti) 32 गणांसाठी आज आरक्षण जाहीर (Gan Reservation Announced) करण्यात आले. संगमनेर तहसिल कार्यालयातील (Sangamner Tahsil Office) सभागृहात सकाळी 11 वाजता आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये अनेक मातब्बरांना धक्का बसला आहे.

नेवासा तालुक्यातील पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत जाहीर

संगमनेर पंचायत समिती (Sangamner Panchayat Samiti) सार्वत्रिक निवडणूक 2022 करीता पंचायत समिती निर्वाचन गणातील आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नियंत्रक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे (Dr. Shashikant Mangarule) यांच्या मार्गदर्शनाखाली सोडतीची कार्यवाही करणारे अधिकारी तथा तहसिलदार अमोल निकम यांच्या उपस्थित पार पडला.

श्रीरामपुर पंचायत समितीच्या गणांची सोडत; असे आहेत आरक्षण

संगमनेर पंचायत समितीवर काँग्रेसची एक हाती सत्ता आहे. आज झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये काही नेते मंडळींना मतदार संघात आपेक्षित आरक्षण मिळाल्याने समाधान आहे तर काहींना आपला मतदार संघ आरक्षीत झाल्याने मोठी अडचण झाली आहे. आरक्षणाचे प्रारुप जाहिर करण्यात आले असून आरक्षणाबाबत हरकती किंवा सूचना करावयास असल्यास दि. 2 ऑगस्ट 2022 रोजी पर्यंत करता येईल. 6 गणांचे आरक्षण प्राधान्यक्रमाने तर 10 आरक्षण सोडतीने जाहीर करण्यात आले. यावेळी संस्कार धोत्रे या मुलाच्या हाताने चिठ्ठ्या काढण्यात आल्या.

राहुरी पंचायत समितीचे आरक्षण जाहीर

संगमनेर पंचायत समिती करीता आरक्षण सोडत –

1) निमोण – नागरीकांचा मागास प्रवर्ग (प्राधान्यक्रम)

2) समनापूर – नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला)

3) तळेगाव दिघे – नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला)

4) कोकणगाव – सर्वसाधारण

5) आश्वी बुद्रूक – सर्वसाधारण

6) आश्वी खुर्द – नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला)

7) जोर्वे – अनुसूचित जाती (महिला)

8) आंभोरे – अनुसूचित जमाती (महिला)

9) वडगावपान – नागरीकांचा मागास प्रवर्ग

10) संगमनेर खुर्द – सर्वसाधारण

11) घुलेवाडी – अनुसूचित जाती

12) गुंजाळवाडी – सर्वसाधारण (महिला)

13) राजापूर – सर्वसाधारण (महिला)

14) धांदरफळ बुद्रूक – सर्वसाधारण

15) चंदनापुरी – सर्वसाधारण (महिला),

16) पेमगिरी – सर्वसाधारण (महिला)

17) वरवंडी – सर्वसाधारण

18) साकुर – अनुसूचित जमाती

19) खंदरमाळवाडी – सर्वसाधारण

20) बोटा – सर्वसाधारण (महिला) .

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *