Thursday, April 25, 2024
Homeनगरअतिक्रमण धारकांवर संगमनेर नगरपरिषदेकडून धडक कारवाई

अतिक्रमण धारकांवर संगमनेर नगरपरिषदेकडून धडक कारवाई

संगमनेर (प्रतिनिधी) –

संगमनेर नगरपरिषदेच्यावतीने शहरातील नवीन अकोले रोड, बस स्थानक पार्किंग परिसरात असलेले अतिक्रमण काल सकाळी

- Advertisement -

काढण्यात आले. यामुळे या परिसराने मोकळा श्‍वास घेतला आहे.

मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल यांच्या उपस्थितीत अतिक्रमण पथकाने धडक कारवाई केली. नवीन अकोले रोड ते बी.एड. कॉलेज सर्कल जवळील रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण धारकांनी हातगाड्या, पलंग, टपल्या टाकून कपडे, भाजीपाला व इतर साहित्याची विक्री करत असे. त्यामुळे रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता. बस स्थानक परिसरातील वाहनांसाठी पार्किंग असलेल्या जागेत फळ विक्रेते, हार विक्रेत्यांनी दुकाने थाटून व्यवसाय सुरु केला होता. त्यामुळे वाहने पार्किंग करण्यास मोठी अडचण होत होती. याबाबत अनेकांनी तक्रारीही पालिकेकडे केल्या होत्या. नागरीकांच्या सुविधेसाठी व रहदारी सुरळीत व्हावी, या उद्देशाने संगमनेर नगर परिषद, बस स्थानक, शहर पोलीस स्टेशन यांनी अतिक्रमण विरोधी संयुक्त अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली.

अतिक्रमण धारकांवर करण्यात आलेल्या कारवाईमध्ये नगरपरिषदेचे अतिक्रमण पथकातील सुदाम सातपुते, अल्ताफ शेख, आकलाक शेख, राजेंद्र सुरग यासह विविध विभागातील कर्मचारी, एसटी विभागाचे मेढे यांनी सहभाग घेतला.

यापुढील काळात बस स्थानक व इतर वर्दळीच्या ठिकाणी अतिक्रमण केल्यास संबंधीतांवर कोणतीही पूर्व सूचना न देता कडक कारवाई करण्याचे संकेत मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या