संगमनेर व अकोलेत कांद्याला मिळतोय हा भाव

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये (Sangamner Agricultural Produce Market Committee) आज दि. 7 रोजी 16 हजार 45 कांदा गोणीची आवक (Onion inward) झाली. एक नंबर कांद्यास 1351 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव (Market) मिळाला.

नं. 1 रु 1151 ते 1351, नं. 2 ला रु. 951 ते 1151, नं. 3 ला रु. 751 ते 951, गोल्टी रु. 851 ते 1000, खाद रु. 150 ते 551 या प्रमाणे बाजारभाव (Market) मिळाले आहे.

संगमनेर बाजार समितीमध्ये (Sangamner Agricultural Produce Market Committee) आठवड्यातून सोमवार ते शुक्रवार या सलग पाच दिवशी शेतकरी वर्गाने आपला कांदा योग्य बाजार भाव मिळण्यासाठी लिलावाच्या दिवशी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत व कांदा 50 किलो बारदान गोणीत, वाळवून, निवड करुन बाजार समितीमध्ये विक्री साठी बाजार समितीच्या आवारात आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, सर्व संचालक मंडळ व सचिव सतिष गुंजाळ यांनी केले आहे.

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये (Akole Agricultural Produce Market Committee) आज दि. 7 रोजी 4791 कांदा गोणीची आवक (Onion inward) झाली. एक नंबर कांद्यास 1311 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.

नं. 1 रु 1151 ते 1311, नं.2 ला रु. 1051 ते 1251, नं. 3 ला रु. 851 ते 1050, गोल्टी रु. 751 ते 1000, खाद रु. 150 ते 551 प्रमाणे बाजारभाव मिळाले आहे.

अकोले बाजार आवारात (Akole Market) रविवार, मंगळवार, गुरुवार या तीन दिवशी लिलाव होत आहेत. शेतकरी वर्गाने कांदा लिलाव वेळेत पूर्ण करण्याचे दृष्टीने कांदा वजन लिलावाच्या आदल्या दिवशी सकाळी 12 ते 8 वाजेपर्यंत व लिलावाच्या दिवशी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत केले जाईल याची नोंद हमाल, मापाडी, आडत व्यापारी, शेतकरी बंधूनी घ्यावी. शेतकरी बंधूनी कांदा विक्रीस आणताना 50 किलो बारदान गोणीत, वाळवून, निवड करुन बाजार समितीमध्ये विक्री साठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती परबतराव नाईकवाडी, उपसभापती भरत देशमाने, संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *