Monday, April 29, 2024
Homeनगरसंगमनेर कारागृहातील कैद्याचा वाढदिवस वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडून चौकशी सुरु

संगमनेर कारागृहातील कैद्याचा वाढदिवस वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडून चौकशी सुरु

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर येथील कारागृहात चार महिन्यांपूर्वी एका कैद्याचा वाढदिवस साजरा झाल्याने या प्रकरणाची शिर्डी येथील पोलीस उपअधीक्षक यांनी चौकशी सुरू केली आहे. या चौकशीनंतर हे प्रकरण तत्कालीन पोलीस निरीक्षकांना चांगलेच भोवणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisement -

संगमनेरच्या कारागृहातील अनेक गैरप्रकार यापूर्वीच चव्हाट्यावर आले आहेत. या कारागृहामध्ये नेहमी क्षमतेपेक्षा अधिक कैदी शिक्षा भोगत असतात. या कैद्यांना कारागृहात सर्व सुविधा उपलब्ध होत असतात. घरचे जेवण, गुटखा, तंबाखू, पाणी आदी सुविधा या कैद्यांना सहज मिळतात. या कारागृहात चक्क मोबाईलचा ही वापर होत होता. यारूकारागृहात हाणामारीचे प्रकारही घडत असतात. याबाबत दैनिक सार्वमतने वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले आहे.

संगमनेर येथील कारागृहात एका कैद्याचा वाढदिवस साजरा झाल्याने याप्रकरणी चार पोलिसांना निलंबित करण्यात आले होते. या वाढदिवसाच्या प्रकरणाची आता शिर्डी येथील पोलीस उपअधीक्षक हे चौकशी करत आहे. या चौकशी दरम्यान संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील काही पोलीस कर्मचार्‍यांचे जबाब नोंदविण्यात आलेले आहेत. या पोलिसांनी कारागृहात चालणार्‍या प्रकारांची चौकशी अधिकार्‍यांना माहिती दिली आहे. कारागृहातील कैद्यांना मिळत असलेल्या सुविधांना तत्कालीन पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख हे जबाबदार असल्याचा जबाब काही पोलिसांनी दिल्याची खात्रीलायक माहिती आहे. यामुळे जिल्हा पोलीस प्रमुख तत्कालीन पोलीस निरीक्षकांवर कोणती कारवाई करणार याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या