Friday, April 26, 2024
Homeनगरसंगमनेर शहर पोलीस ठाण्याचा ‘राम भरोसे’ कारभार; आवारात वेड्यांची वर्दळ

संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा ‘राम भरोसे’ कारभार; आवारात वेड्यांची वर्दळ

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात जबाबदार पोलीस अधिकारी नसल्याने या पोलिस ठाण्याचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे. रात्रपाळीच्या गस्तीवरील पोलीस कर्मचारी ढाराधूर झोपत असल्याने गुन्हेगारांचे चांगले फावले आहे. गेले काही दिवसांपासून पोलीस ठाण्याच्या आवारात वेड्यांचीही वरदळ वाढली आहे. या वेड्यांकडेही कुणाचे लक्ष नसल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. त्यांच्याबाबत अनेक तक्रारी गेल्यानंतर त्यांची रवानगी पोलीस मुख्यालयात करण्यात आली. त्यानंतर शहर पोलीस ठाण्याला पोलीस निरीक्षक नेमण्यात आलेला नाही. सध्या प्रभारी पोलीस निरीक्षक या पोलीस ठाण्याचा कारभार पाहत आहे. प्रभारी पोलीस निरीक्षकांचे नियंत्रण शहर पोलीस ठाण्यात नसल्याने याचा अनेकांनी गैरफायदा घेतला आहे.

संगमनेर शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोर्‍यांचे प्रमाण वाढलेले आहे. मध्यरात्री चोरी करणारे चोर आता रात्री दहा वाजता चोरी करू लागले आहे. या चोरट्यांचा तपास लावण्यात या पोलिसांना अपयश येत आहे. रात्रीच्या वेळी गुन्हेगारीचे प्रमाण मोठे असते. यामुळे रात्रपाळीच्या बंदोबसासाठी खास पोलिसांची नियुक्ती करण्यात येते गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहर व परिसरात रात्रपाळीचे पोलीस बंदोबस्त करताना आढळत नाही. याचा गुन्हेगारांनी चांगलाच फायदा घेतलेला आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या आवारात गेल्या काही दिवसांपासून अनेक वेड्यांची वर्दळ वाढलेली आहे. पोलिसांचे नियंत्रण असल्याने त्यांची मनमानी वाढलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून बस स्थानकावर फिरणार्‍या एका वेड्या महिलेचीही पोलीस ठाण्यात ये-जा वाढलेली आहे. पोलिसांना शिव्या देणारी ही वेडी महिला थेट पोलीस निरीक्षकांच्या कार्यालयातही घुसत आहे. गेले काही दिवसांपासून शहर पोलीस ठाण्याचा कारभार रामभरोसे बनला आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांनी या पोलीस ठाण्यात तातडीने पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या