Friday, April 26, 2024
Homeनगरसंगमनेर बस स्थानकावर प्रवाशाची सोन्याची चैन लांबविली

संगमनेर बस स्थानकावर प्रवाशाची सोन्याची चैन लांबविली

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर बस स्थानकाहून (Sangamner Bus Stand) बसमध्ये (Bus) बसत असतांना अज्ञात इसमाने प्रवाशाच्या गळ्यातील 45 हजार रुपयांची सोन्याची चैन (Gold Chain) लांबविल्याची घटना बुधवारी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात (Sangamner Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

भंडारदरा परिसरात ‘या’ कालावधीत राहणार एकेरी वाहतुक

सोपान नारायण फापाळे (वय 63, रा. घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम, मुळ रा. बेलापुर, ता. अकोले) हे बुधवारी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास संगमनेर बस स्थानकावर (Sangamner Bus Stand) आले होते. ते संगमनेर-हिवरगाव आंबरे बसमध्ये चढत असतांना त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन (Gold Chain) कुणीतरी अज्ञात इसमाने गर्दीचा फायदा घेत चोरुन नेली.

अगस्ति सेतू पूल पाण्याखाली; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

याबाबत सोपान फापाळे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 664/2022 भारतीय दंड संहिता 379 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस नाईक सोनवणे करत आहे.

पिकअप-मोटारसायकलची जोरदार धडक; दोन जण ठार

- Advertisment -

ताज्या बातम्या