Wednesday, April 24, 2024
Homeक्रीडा'प्रतीक्षा'ने मैदान मारलं! ठरली पहिली 'महिला महाराष्ट्र केसरी'

‘प्रतीक्षा’ने मैदान मारलं! ठरली पहिली ‘महिला महाराष्ट्र केसरी’

सांगली | Sangali

महाराष्ट्रात पहिल्यांदाच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. सांगली येथे ही महिला कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत सांगलीतील प्रतीक्षा बागडी आणि कल्याणमधील वैष्णवी पाटील यांच्यात अंतिम लढत झाली. या लढतीत प्रतीक्षा बागडीने वैष्णवी पाटीलला चितपट करत पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला आहे.

- Advertisement -

पुरुषांबरोबरच महिला कुस्तीला देखील प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे तर्फे यंदा प्रथमच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. २३ आणि २४ मार्च दरम्यान यास्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेची अंतिम लढत सांगलीची महिला पैलवान प्रतीक्षा बागडी आणि कल्याणची पैलवान वैष्णवी पाटील यांच्यात पारपडली. कधीकाळी दोघी एकाच रूममध्ये राहत होत्या. तेव्हा मैत्रिणींमधील या लढतीची उत्सुकता सर्वांमध्ये होती अखेर प्रतीक्षा बागडी वैष्णवी पाटीलला चितपट करून ही स्पर्धा जिंकली.

हृदयद्रावक! रेल्वे रुळ ओलांडणं जीवावर बेतलं, पती पत्नीसह तीन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

स्पर्धेच्या उपांत्य लढतीत प्रतीक्षा बागडी हिने कोल्हापूरच्या अमृता पुजारीवर मात केली होती. प्रतीक्षाने ९-२ अशा गुण फरकाने अमृताचा पराभव करून पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत धडक मारली होती.

कोण आहे प्रतीक्षा बागडी?

प्रतीक्षा रामदास बागडी ही २१ वर्षांची असून तिचं वजन ७६ किलो इतकं आहे. ती सांगलीच्या तुंग गावची महिला पैलवान आहे. ती सांगली शहरातील यशवंत नगरमधील वसंतदादा कुस्ती केंद्र मध्ये सराव करते. तिला प्रशिक्षक सुनील चंदनशिवे यांच्याकडून मार्गदर्शन केलं जातं. प्रतीचे वडील रामदास बागडी हे पोलीस हवालदार आहेत. प्रतीक्षाने राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आतापर्यंत दोन पदकाची कमाई केली आहे. ती ढाक, टांग मारणे डावात तरबेज आहे.

राहुल गांधींची खासदारकी रद्द होताच उद्धव ठाकरेंनी भाजपला डिवचलं; म्हणाले, “चोराला चोर…”

कोण आहे वैष्णवी पाटील?

पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उपविजेत्या ठरलेली कल्याणती वैष्णवी पाटील ही १९ वर्षांची आहे. ती कल्याणची महिला पैलवान आहे. ती कल्याणच्या नांदीवली परिसरातील जय बजरंग तालीम संघ येथे सराव करते. तिने विशाखापट्टणम येथे सीनियर नॅशनल चॅम्पियनशिप ब्राँझ मिडलची कमाई. तिला प्रशिक्षक प्रज्वलित ढोणे यांचे मार्गदर्शन मिळते. ती सालतु डावात तरबेज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या