Saturday, April 27, 2024
Homeनगरचंदनाच्या झाडाची धाडसी चोरी

चंदनाच्या झाडाची धाडसी चोरी

आश्वी |वार्ताहर| Ashwi

चंदनाच्या (Sandalwood) लाकडाला सोन्याचा भाव मिळत असल्यामुळे संगमनेर (Sangamner) तालुक्यातील आश्वी खुर्द (Ashwi Khurd) शिवारात राहत असलेल्या चांगदेव सोनवणे यांच्या घरासमोरील अंगणातून दोन चंदनाची झाडे चोरीला (Sandalwood Trees Stolen) गेल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

राहाता बाजार समितीत कांदा व डाळींबाची आवक; वाचा भाव

प्रगतशील शेतकरी चांगदेव सोनवणे यांची आश्वी खुर्द (Ashwi Khurd) गावच्या पुर्व दिशेला शेती व मोठा प्रशस्त असा बंगला आहे. या बंगल्याच्या परसबागेत विविध फुल व फळझाडे आहेत. तसेच याठिकाणी सात ते आठ वर्षाची दोन चंदनाची झाडे (Sandalwood Trees) देखील होती. सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी बंगल्याच्या कुंपनाची जाळी तोडून आतमध्ये प्रवेश करत ही दोन चंदनाची झाडे कापून काढत त्यांना आवश्यक असलेला चंदनाचा गाभा (Sandalwood Core) घेऊन पलायन केले. विशेष म्हणजे यावेळी चांगदेव सोनवणे व त्यांचे कुटुंबीय घरातचं होते तर बाहेर त्यांचे पाळीव कुत्रे असूनही चोरट्यांनी ही झाडे चोरुन नेली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे.

हरिश्चंद्रगड परिसरात जोरदार पाऊस; मुळा नदी दुथडी

चंदन तस्कर मोठ्या शिताफीने चंदनाची झाडे (Sandalwood Trees) तोडून नेल्याच्या घटना अधूनमधून ऐकू येत असल्यातरी चोरट्याचा मात्र तपास लागत नाही. त्यामुळे सामान्य नागरीकांनी घराच्या अंगणात लावलेली आणि जीवापाड जपलेली चंदनाची झाडे चोरीला (Sandalwood Trees Stolen) जाण्याच्या घटना या नियमित घडत आहेत. वाळू तस्करी, लहान मोठ्या घरफोड्या, दुचाकी चोर्‍या, वाहन चोर्‍या व आता चंदन झाडांची चोरी (Sandalwood Trees Stolen) सतत होत आहे. मात्र पोलिसांचा तपास संथ गतीने सुरु असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडुन कठोर कारवाईची नागरीकांची अपेक्षा पुर्ण होत नसून पोलीस प्रशासन करत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

दारणा पाठोपाठ भावलीही ओव्हरफ्लो

- Advertisment -

ताज्या बातम्या