Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकसराईत चंदनचोरास शिताफिने अटक

सराईत चंदनचोरास शिताफिने अटक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

दि. 16 फेब्रुवारी रोजी रात्री विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बीजी शेखर पाटील (Special Inspector General of Police Dr. BG Shekhar Patil) नाशिक (nashik) यांच्या सरकारी निवासस्थानाच्या परिसरातील कोपर्‍यातील चंदनाचे झाड (Sandalwood tree) चोरीला गेलें होते.

- Advertisement -

चंदनाच्या झाडाचा बॅटरीवरील करवतीने कापून त्यातील आतील गाभा चोरून नेला होता. त्यासंदर्भात भद्रकाली पोलीस स्टेशनला (Bhadrakali Police Station (चोरीचा व खाजगी आवारात बेकायदेशीर प्रवेश केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यादिवशी विशेष पोलीस महानिरीक्षक हे सरकारी कामानिमित्त महत्वाच्या शासकीय बैठकीसाठी मुंबई (mumbai) येथे गेले होते.

मुंबईवरून परत आल्यावर त्यांनी तत्काळ पोलीस निरीक्षक भद्रकाली व त्यांचीं टीम तसेच क्राईम ब्रँच नाशिक (Crime Branch Nashik) यांची टीम, एलसीबी हेमंत पाटील (LCB Hemant Patil) व त्यांची टीम यांची तत्काळ डिटेक्शनवर मीटिंग (Meeting on detection) घेत त्यांना गुन्ह्याबद्दल बारकाईने मार्गदर्शन केले. क्राईम ब्रँच युनिट 2 ची टीम मिळालेल्या गुप्त माहितीवरून जालना जिल्ह्यातील भोकरदन या ठिकाणी तात्काळ रवाना करण्यात आले.

जालना पोलीस अधीक्षक विनायक देशमुख (Jalna Superintendent of Police Vinayak Deshmukh) व भोकरदन व तपासणी पथकांची संपर्क साधण्यात आला. डॉक्टर शेखर यांनी स्वतः पोलीस अधीक्षक जालना भोकरदनच्या अधिकार्‍यांना सूचना केल्या. स्थानिक पोलिसांची मदत घेऊन पहाटे पहाटे आरोपीच्या घरावर छापा टाकण्यात आला. संशयित आरोपी याने कडी वाजलेले ऐकताच त्याला पोलिसांचा संशय आला व त्यांनी मागच्या दरवाज्यातून पलायन करून दुसर्‍या मजल्यावर गेला.

तिथून नऊ ते दहा बिल्डींगवरून उड्या मारत त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु तपास पथक आणि स्थानिक पोलिस (Local police) यांनी त्याचा पाठलाग रात्रीच्या अंधारात सुरू केला आणि मोठ्या कौशल्याने त्याला पाटलाग करून भोकरदनला कोटरा बाजार या गावांमध्ये पकडले. नाशिक शहरामध्ये घडलेले सातपूर, पोस्ट ऑफीस, जेलरचे निवास्थान व इतर ठिकाणचे सुमारे आठ ते नऊ गुन्ह्यांची कबुली दिली.

सराईत गुन्हेगार जावेदखा पठाण हा साथीदारांसह म्हणून मोटरसायकल आले. नाशिकमध्ये एका हॉटेलमध्ये राहिले आणि सरकारी बंगल्यांची निवासस्थानाचे रेकी करून त्यातील चंदनाचे झाड मोठ्या कौशल्याने व चोरून प्रवेश करून चोरी करून पलायन केल होते. बीजी शेखर पाटील यांनी नाशिक क्राइम ब्रांच व त्यांच्या सहकार्‍यांच्या मदतीने सराईत आरोपीला अटक करण्यात यश मिळवले.

- Advertisment -

ताज्या बातम्या