Friday, April 26, 2024
Homeनगरवाळूच्या साधनांमुळे पुणतांबा परिसरातील रस्त्यांचा बोजवारा

वाळूच्या साधनांमुळे पुणतांबा परिसरातील रस्त्यांचा बोजवारा

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

परिसरातील गोदावरी नदीपात्रातून तसेच सरकारी वाळूच्या डेपोतून सध्या मोठ्या प्रमाणात जड वाहतूक साधनांमार्फत वाळूची वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जात असल्यामुळे पुणतांब्याला जोडणार्‍या सर्वच रस्त्यांचा बोजवारा उडाला आहे.

- Advertisement -

शासनाच्या वाळू धोरणानुसार सध्या नायगाव व पुणतांबा येथे वाळूचे अधिकृत डेपो आहेत. शासनाच्या नियमानुसार ज्यांनी नोंदणी केली त्यांना वाळू दिली जाते. मात्र या वाळूची वाहतूक डंपर, ट्रॅक्टर तसेच अवजड साधनांमार्फत केली जाते. वाळूची मागणी असल्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते.

प्रत्येक पाच मिनिटाला येथील स्टेशन रोडवरून वाळूची साधने जा-ये करतात. विशेष गोदावरी नदीपात्रातूनही बोरबन भागात दिवसाढवळ्या वाळूचा बेकायदा उपसा करून वाहतूक केली जाते. त्यामुळे सध्या सरकारी वाळू कोणती व बेकायदा वाळू कोणती हे कुणाला समजत नाही व कोणी विचारत नाही.

पुणतांबा गावात महसूल विभागाचे कोणतेही अधिकारी राहत नाही. तसेच त्यांनी वाळूच्या वाहनांवर कारवाई केल्याचे क्वचितच आढळते. त्यामुळे सध्या पुणतांबा परिसरात वाळूच्या व्यवसायाला सुगीचे दिवस आहेत. महसूलमंत्री राहाता तालुक्यातील असून पुणतांबा गावाचा समावेशही या तालुक्यात आहे. असे असताना येथील वाळू उपशावर कोणाचे नियत्रंण आहे की नाही याबाबत ग्रामस्थ साशंक आहेत. वाळूचा उपसा करणारे अनेक बिगर नंबरची साधने आहेत त्यावर सुद्धा कारवाई करण्याची गरज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या