Thursday, April 25, 2024
Homeनगरवाळूच्या ट्रॅक्टरची धडक ; बालकाचा करूण अंत

वाळूच्या ट्रॅक्टरची धडक ; बालकाचा करूण अंत

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

भरधाव जाणार्‍या वाळूच्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात बालक जागीच ठार झाल्याची घटना काल रात्री साडेसात वाजेच्या सुमारास शहरातील कोल्हेवाडी रोड परिसरात घडली. संगमनेर शहर व परिसरात वाळूची बेकायदेशीर वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. महसूल व पोलीस खात्याचे याकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याने वाळूतस्करांची चांगलेच फावले आहे. वाळू तस्करांवर नियंत्रण नसल्याने दिवस-रात्र वाळूचा उपसा सुरू आहे.

- Advertisement -

काल रात्री साडेसात वाजेच्या सुमारास कोल्हेवाडी रोड परिसरातून नंबर नसलेला एक ट्रॅक्टर वाळूची वाहतूक करत होता. गर्दीच्या रस्त्यातून तो भरधाव जात असताना या ट्रॅक्टरने एका बालकाला धडक दिली. या अपघातात एका बालकाचा जागीच मृत्यू झाला व एकजण जखमी हा एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते. अपघातानंतर वाहन चालक मात्र पसार झाला घटनेची माहिती समजताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून बालकाचा मृतदेह हलवला. रात्री उशिरापर्यंत अपघाताचा गुन्हा दाखल झाला नव्हता.

- Advertisment -

ताज्या बातम्या