Friday, April 26, 2024
Homeजळगावपातोंडी सरपंचावर वाळू चोरीचा गुन्हा दाखल ; सरपंचपदही धोक्यात

पातोंडी सरपंचावर वाळू चोरीचा गुन्हा दाखल ; सरपंचपदही धोक्यात

रावेर|प्रतिनिधी

पातोंडी, ता.रावेर raver

- Advertisement -

येथील सरपंचावर विनापरमिट वाळू चोरी चांगलीच महागात पडणार आहे.त्यांच्यावर रावेर पोलिसात वाळू चोरीचा गुन्हा दाखल झाला झाला असून, पोलिसांनी अटक केली आहे.तर ते ग्रामस्तरीय दक्षता समितीचे अध्यक्ष असल्याने तहसीलदार यांच्यावतीने त्यांच्याविरुद्ध अपात्रतेचा प्रस्ताव पाठवला जाणार असल्याने सरपंच पदही धोक्यात येणार आहे.

येथील सरपंच मोहन बोरसे हे पुंनखेडा शिवारातून भोकर नदी पत्रातून ट्रक्टरने वाळू चोरी करत असल्याचे सोमवारी मध्यरात्री पोलिसांना आढळून आल्याने, त्यांच्यावर रावेर पोलिसात पोलीस नाईक सुरेश मेढे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता.त्यानंतर त्यांना अटक देखील झाली आहे.ग्राम स्तरीय दक्षता समितीच्या माध्यमातून परिसरातील वाळू चोरी रोखण्याची जबाबदारी सरपंच असलेल्या मोहन बोरसे यांच्यावर असतांना त्यांच्याकडूनच चोरी झाल्याने,तहसीलदार यांच्यावतीने त्यांचे सरपंचपद अपात्र करण्याबाबत प्रस्ताव पाठवला जाणार आहे,सरपंच बोरसे यांना वाळू वाहतूक चांगलीच महागात पडणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या