Thursday, April 25, 2024
Homeनगरगोदावरी नदीपात्रातून मोठ्या यंत्राने वाळू उपसा

गोदावरी नदीपात्रातून मोठ्या यंत्राने वाळू उपसा

श्रीरामपुर | प्रतिनिधी | Ahmednagar

गोदावरी नदीपात्रातून मोठ्या यंत्राने वाळू उपसा करणाऱ्या पाच जणांसह पोलिसांनी

- Advertisement -

पोकलेन, बुलडोझर, मालट्रक व मोबाईल असा १ कोटी ८३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

तालुक्यातील मातुलठाण परिसरात पोकलेनच्या सहाय्याने वाळू उपसा होत असल्याच्या मिळालेल्या महितीनंतर, श्रीरामपुर पोलिसांनी मातुलठाण शिवारातील गोदावरी नदीपात्रात दि. 29/03/2021 रोजी छापा टाकला असता तेथे पोकलेनच्या सहाय्याने वाळू उपसा होत असल्याचे आढळून आले.

श्रीरामपुर पोलिसांनी सदर ठिकाणाहून सुनीलकुमार चूरामन महतो (वय 24 वर्ष, रा .धोडावस्ती, ता. बेरमो, जि. बोकारो, राज्य झारखण्ड. हल्ली मनजीत सिंग धुप्पड यांचेकडे रा. आनंदवली नाशिक), मनजीत सिंग धुप्पड (रा. आनंदवली, नाशिक), अंजनी गौरीशंकर विश्वकर्मा (वय 24, रा. राजोहा, ता. बहरी, जि. सिधी, मध्य प्रदेश), युवराज सिंग केशर सिंग भंडारी (वय 40, रा. डी जी बागेसर, जि. डेहराडून) व रवी धुप्पड (रा. श्रीरामपूर) यांच्याकडुन २ पोकलेन, १ बुलडोझर ,१ ट्रक, १ मोबाईल व ४ ब्रास वाळू असा एकूण १ कोटी ८३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. यावेळी अन्य एक आरोपी फरार झाला. सर्व आरोपींविरुध्द श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पोलिस उपनिरिक्षक अतुल बोरसे, सहायक फौजदर राजेंद्र आरोळे, पो. हे का सुरेश औटी, पो हे का सतीश गोरे, पो ना लोंढे, गोरे, रणवरे, पोलीस कॉन्स्टेबल काका मोरे, नितीन चव्हाण, रवींद्र माळी, नितीन शिरसाठ, सुनील शिंदे यांनी ही कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या