Saturday, April 27, 2024
Homeनंदुरबारकवठळ येथे तापीपात्रातून बोटीद्वारे वाळूचा उपसा

कवठळ येथे तापीपात्रातून बोटीद्वारे वाळूचा उपसा

सारंगखेडा ता. शहादा । वार्ताहर

जिल्हयातील तीन वाळू घाटांच्या लिलावापैकी कवठळतर्फे सारंगखेडा वाळू घाटाचा लिलावाचा मुहूर्त झाला असला तरी या ठिकाणी रात्रीच्या वेळी पाण्यात बोटी टाकून बेसूमार वाळू काढली जात आहे.

- Advertisement -

पर्यावरणाच्या नियमानुसार प्रशासनाने पाण्यात बोटींच्या वापराला परवानगी नाकारली असली तरी बेकादेशिरपणे मोठया प्रमाणात बोटी पाण्यात टाकण्यात आल्या आहेत.

शासनाने महसूली उत्पन्न वाढविण्यासाठी जिल्हयातील तापी नदीतील तीन वाळू घाटांचा लिलाव केला आहे. गेल्या चार वर्षानंतर लिलाव काढण्यात आला आहे . यापैकी कवठळतर्फे सारंगखेडा (ता. शहादा) येथील लिलाव तीन कोटी रुपयांचा झाला आहे. यासाठी अनेक अटी, शर्ती, नियमावली प्रशासनाने लागू केल्या आहेत. रात्रीच्या सुमारास वाळू काढण्यास बंदी आहे तसेच पाण्यात इंधन मिश्रण होऊ नये म्हणून बोटीच्या साह्याने वाळू काढण्यासही बंदी असतांनाही चार दिवसापासून रात्रभर बोटीच्या साह्याने वाळू उपसा सुरु आहे. त्यामुळे पाण्यात मोठ्या प्रमाणात इंधन मिश्रण होत असल्याने पाणी दुषीत होत आहे.

हद्द सोडून वाळू उपसा

वाळू काढण्यासाठी लिलाव देतांना प्रशासनाकडून वाळू घाटांचा वाळू उपसा करण्यासाठी मर्यादित हद्द देण्यात आली आहे. वाळू खोदकाम, लांबी, रुंदीचे अंतर दिलेले आहे. त्यानुसार वाळू उपसा करण्यास परवानगी असते. मात्र, बोटीद्वारे वाळू उपसा करतांना हद्द सोडून अन्य बाजूनी वाळू उपसा होत आहे. त्यामुळे सर्वत्र बोटी यंत्रामुळे इंधन तापी पात्रातील पाणी दुषीत होत आहे. त्यामुळे मानव, प्राणी, पक्षी यातुन पाणी पितात त्यांच्यावर दुष्परीणाम होऊ शकतो . त्यामुळे रात्री होणारी बेकादेशिर वाळू उपसा थांबविण्याची मागणी पारिसरातून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या