Friday, April 26, 2024
Homeधुळेजिल्ह्यात 6 कापूस खरेदी केंद्रांना मंजुरी

जिल्ह्यात 6 कापूस खरेदी केंद्रांना मंजुरी

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

जिल्ह्यात एकुण 6 कापूस खरेदी केंद्रांना सी.सी.आय.ने तत्वत: मंजुरी दिली आहे. पैकी शिंदखेडा आणि दोंडाईचा येथील सी.सी.आय.संचलित केद्रांवर दि. 5 नोव्हेंबर पासून कापूस खरेदी सुरु झालेली असून 601 शेतकर्‍यांचा 18 हजार 780 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.

- Advertisement -

भारतीय कपास निगम (सी.सी.आय.) यांचे मार्फत जिल्हयात कापूस उत्पादक शेतकर्‍यांचा कापूस शासकीय हमीभावाने खरेदीसाठी शिंदखेडा तालुक्यातील वर्धमान जिनिंग प्रेसिंग, अभिषेक जिनिंग प्रेसिंग, शिंदखेडा, केशरानंद जिनिंग प्रेसिंग दोंडाईचा आणि शिरपूर तालुक्यातील मे.डी.आर.कॉटन, दहिवद रोड चोपडा, शुभम जिनिंग प्रेसिंग,शहादा चोपडा रोड, आणि प्रियदर्शनी सहकारी सुतगिरणी, दहिवद चोपडा रोड, शिरपूर अशा एकुण 6 कापूस खरेदी केंद्रांना सी.सी.आय.ने तत्वत: मंजुरी दिली आहे.

पैकी वर्धमान जिनिंग प्रेसिंग शिंदखेडा आणि केशरानंद जिनिंग प्रेसिंग दोंडाईचा येथील सी.सी.आय.संचलित केद्रांवर दि. 5 नोव्हेंबर पासून कापूस खरेदी सुरु झालेली आहे. 601 शेतकर्‍यांचा 18780 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आहे.

जिल्हयातील बाजार समितीमार्फत कापूस विक्रीसाठी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याचे प्रस्तावित असून याबाबत जिल्हयातील शेतकर्‍यांना कळविण्यात येईल.तुर्त ऑफलाईन रितीने कापूस खरेदीसाठी बाजार समिती कडून टोकन देण्यात येत आहे.

जिल्हयातील कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी कापूस विक्रीसाठी दोंडाईचा कृषि उत्पन्न बाजार समिती आणि कृषि उत्पन्न बाजार समिती, शिरपूर यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या