Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनिमगाव-सिन्नर सोसायटीचे सानप चेअरमन

निमगाव-सिन्नर सोसायटीचे सानप चेअरमन

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

तालुक्यातील निमगाव सिन्नर (Nimgaon – Sinnar) कार्यकारी सोसायटीच्या (Executive Society) चेअरमनपदी बाजार समितीचे संचालक दत्तात्रय सानप (Director of Market Committee Dattatraya Sanap as Chairman) यांची तर व्हा. चेअरमनपदी रामदास सांगळे यांची आज (दि.12) निवड करण्यात आली.

- Advertisement -

संस्थेची निवडणूक (election) नुकतीच बिनविरोध झाली असून पदाधिकार्‍यांची निवड करण्यासाठी नवनिर्वाचीत संचालक मंडळाची विशेष सभा सहाय्यक निबंधक कार्यालयात पार पडली. अध्यक्षस्थानी सहकार अधिकारी आर. बी. त्रिभुवन होते. निर्धारीत वेळेत सानप व सांगळे यांचे प्रत्येकी एकच अर्ज आल्याने दोघांची बिनविरोध निवड (Unopposed selection) झाल्याची घोषणा त्रिभुवन यांनी केली.

सानप यांच्या अर्जावर सूचक म्हणून रंगनाथ सानप यांनी तर अनुमोदक म्हणून मधुकर चंद्रमोरे यांनी सह्या केल्या होत्या. सांगळे यांच्या अर्जावर सुचक म्हणून दत्तू दामू सानप यांनी तर अनुमोदक म्हणून फक्कड यांनी सह्या केल्या होत्या. यावेळी रंगनाथ चिंधु सानप, कैलास रामचंद्र सानप, काशिनाथ विठोबा सानप, संजय मुरलीधर सानप, मारुती बाबुराव सानप, लता चंद्रभान सानप, तानाबाई रामनाथ सानप हे संचालक उपस्थित होते.

निवडीची घोषणा होताच सानप यांच्या समर्थकांनी कार्यालयाबाहेर गुलालाची उधळण करीत आनंद व्यक्त केला. यानंतर नुतन पदाधिकार्‍यांसह संचालकांनी माजी आ. राजाभाऊ वाजे यांची त्यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी राजाभाऊंच्या हस्ते नुतन पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवाजी शेळके, जनार्दन सानप, चांगदेव सानप, बाळासाहेब सानप यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या