Friday, May 10, 2024
Homeनगरसंवत्सर ग्रामिण रुग्णालय 22 कोटी निधीचे श्रेय आमदारांनी लाटू नये - साहेबराव...

संवत्सर ग्रामिण रुग्णालय 22 कोटी निधीचे श्रेय आमदारांनी लाटू नये – साहेबराव रोहोम

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील संवत्सर 30 खाटांच्या ग्रामिण रुग्णालयाच्या 15 कोटी 70 लाख व कर्मचारी निवासस्थान कामासाठी 5 कोटी 63 लाख अशा 21 कोटी 33 लाख रुपये खर्चाच्या कामाचा प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री तसेच आरोग्य मंत्री यांच्या स्तरावर मंजुर झालेला असुन त्यात विद्यमान आमदारांचा काडीचाही संबंध नाही. तेंव्हा त्यांनी फुकटचे श्रेय लाटू नये असे पत्रक भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

- Advertisement -

त्यांनी पुढे म्हटले आहे, कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी 2014 ते 2019 या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात निधी मंजुर करून असंख्य विकासकामे मार्गी लावली आहे. याशिवाय तालुक्यातील रस्ते, वीज, पाणी व आरोग्याच्या मुलभूत समस्या जाणून घेत त्यासाठीचे प्रस्ताव संबंधित कार्यान्वयीन यंत्रणेकडे दाखल करून त्यातील त्रुटी दुर करून सर्व विभागाचे मंत्री, प्रधान सचिव यांच्यास्तरावर ते प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्याचेच हे फलित असून संवत्सरच्या 30 खाटांचे ग्रामिण रूग्णालय व तेथील कर्मचारी निवासस्थानाचा 22 कोटी रूपये खर्चाचा प्रस्ताव मार्गी लागला आहे तेंव्हा आमदारांनी याचे श्रेय लाटुन जनतेमध्ये दिशाभूल करू नये, असेही श्री. रोहम यांनी पत्रकात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या