Thursday, April 25, 2024
Homeधुळेसमता परिषदेतर्फे 1 डिसेंबर रोजी धुळे येथे ओबीसींचा मोर्चा

समता परिषदेतर्फे 1 डिसेंबर रोजी धुळे येथे ओबीसींचा मोर्चा

शिरपूर – Shirpur – प्रतिनिधी :

समता परिषदेतर्फे ओबीसींच्या प्रश्नांसाठी आता ओबीसी संघटना रस्त्यावर उतरणार असून ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लावता कामा नये हा इशारा देण्यासाठी 1 डिसेंबर रोजी धुळे येथे ओबीसींचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. असा निर्णय शिरपूर येथे ओबीसी समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.

- Advertisement -

समता परिषदेने ओबीसी आरक्षणासाठी धुळे येथे 1 डिसेंबर रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. धुळ्यातील महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत 1 डिसेंबर रोजी ओबीसींचा मोर्चा काढण्यात येणार आहे.

यासाठी सर्व तालुक्यात आढावा बैठका घेण्यात येत आहेत. जास्तीत जास्त ओबीसी समाजाने मोर्चात सहभागी होण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कधीही ओबीसी समाजाने विरोध केलेला नाही. मात्र यातील काही घटक हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करीत आहेत.

मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे. मात्र ओबीसींच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता ते आरक्षण दिले पाहिजे. असे बैठकीत निर्णय घेण्यात आला.

यावेळी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल, उपाध्यक्ष गोकुळ पाटील, शिरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, तेली समाजाचे शामकांत ईशी, उत्तमराव माळी तालुका अध्यक्ष रवींद्र माळी, भोई समाजाचे अध्यक्ष सुभाष भोई, समता परिषदेचे युवा जिल्हा अध्यक्ष योगेश बागुल, युवराज माळी, जय माळी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बागुल यांनी केले तर आभार संतोष माळी यांनी मानले.

शिरपूर शहरातील भोई समाज तालुका अध्यक्ष सुभाष सुकलाल भोई यांची जिल्हा उपाध्यक्षपदी तर भाटपुरा येथील प्रशांत रमण चौधरी यांची जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

पिंपळनेर येथे समता परिषदेची बैठक

मराठा आरक्षणाला विरोध नाही पण ओबीसी आरक्षणाला हात न लावता त्यांना आरक्षण द्यावे. मात्र आमच्या हक्काला धक्का लावू नका, अशी भुमिका समता परीषदेने घेतली असल्याचे समता परीषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल यांनी पिंपळनेर येथे ओबीसी कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पिंपळनेर तर्फे आढावा बैठकी घेण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश बागुल, गोकुळ पाटील उपाध्यक्ष, मुकुंद घरटे, प्रकाश शिरसाठ पिंपळनेर, कन्हैयालाल माळी दहिवेल, सुभाष जगताप पिंपळनेर, पांडुरंग सुर्यवंशी, अंबादास वेणुसकर, राजेन्द्र एखंडे, पुरुषोत्तम महाजन, निलेश पगारे, एकनाथ गवळी, राहुल पगारे, सुरेश सोनवणे, तुषार अहिरराव आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या