Friday, April 26, 2024
HomeUncategorizedसॅमसंग गॅलेक्सी M02s स्मार्टफोन भारतात लाँच!

सॅमसंग गॅलेक्सी M02s स्मार्टफोन भारतात लाँच!

नवी दिल्ली l New Delhi

सॅमसंग गॅलेक्सी M02s स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आला आहे, सन 2021 मध्ये भारतात प्रथम लॉन्च केलेला हा स्मार्टफोन आहे. यापूर्वी हा फोन नेपाळमध्ये लॉन्च झाला आहे.

- Advertisement -

सॅमसंग गॅलेक्सी एम02 एस हा कंपनीचा नवीनतम बजेट स्मार्टफोन आहे, ज्याची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी आहे. स्पेसिफिकेशन बद्दल सांगायचे तर गॅलेक्सी M02S स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअप आणि 5,000 एमएएच बॅटरी आहे. खरेदीसाठी या स्मार्टफोनमध्ये तीन रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी M02 दोन कॉन्फिगरेशनमध्ये येते. त्याचे 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरीयंटची किंमत 8,999 रु. आहे, तसेच तुम्ही 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट किंमत 9,999 रुपयात खरेदी करू शकता.

कलर ऑप्शनविषयी बोलताना हा स्मार्टफोन ब्लॅक, निळा आणि लाल रंगाच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल. आपण Amazon.in, Samsung.com आणि सर्व किरकोळ स्टोअरद्वारे सॅमसंग गॅलेक्सी M02S स्मार्टफोन खरेदी करू शकता.

सॅमसंग गॅलेक्सी M02S स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा इन्फिनिटी-व्ही डिस्प्ले आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसरसह सुसज्ज आहे, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह, आपण मायक्रो एसडी कार्डद्वारे 1 टीबी पर्यंत वाढवू शकता.

सॅमसंग गॅलेक्सी M02S स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्याचा प्राइमरी कॅमेरा 13-मेगापिक्सेल, 2-मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे.

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे, ज्यामध्ये अपर्चर एफ/2.2 आहे. या फोनमध्ये आयएसओ कंट्रोल, ऑटो फ्लॅश, डिजिटल झूम, एचडीआर आणि एक्सपोजर सारखी वैशिष्ट्ये आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या