Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षणासाठी संभाजीराजे आक्रमक: पुन्हा राज्यभर दौरा

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे आक्रमक: पुन्हा राज्यभर दौरा

मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje) पुन्हा आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने सारथी सोडलं तर इतर दिलेलं आश्वासन न पाळल्याने संभाजीराजे पुन्हा राज्यभर दौरा करणार आहेत. रायगडपासून 25 ऑक्टोबरला दौऱ्याची सुरूवात होणार आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) संदर्भात राज्य सरकारने दिलेली आश्वासने पाळली गेली नाहीत. त्यामुळे आता चर्चेचा प्रश्नच उद्भवत नाही असं म्हणत खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje)यांनी पुन्हा एकदा राज्यभर दौरा काढण्याचं जाहीर केलं आहे.

खडसेंच्या अडचणी वाढल्या : न्यायालयाने अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला

- Advertisement -

खासदार संभाजीराजे म्हणाले, “मी पुन्हा मराठा समाजाच्या समन्वयकांसोबत पुन्हा एकदा राज्याचा दौरा करत आहे. 25 ऑक्टोबर नंतर हा दौरा सुरू होईल. दौऱ्याची सुरुवात रायगड पासून सोलापूर, उस्मानाबाद, अहमदगनरचा दौरा आधी करणार आहोत.आम्ही गेल्या काही महिन्यांपासून शांत बसलो आहोत. काहीही ठोस निर्णय झालेला नाहीये. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलं त्यानंतर मी नांदेड येथील दौऱ्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. त्यावर सुद्धा काहीही भाष्य नाही. कुठलीही चर्चा नाही. केवळ कोविडचं कारण सांगत पुढे ढकलायचं त्यामुळेच पुन्हा आमचा महाराष्ट्र दौरा सुरू होत आहे.”

संभाजीराजे यांचा टोला

आता चर्चेला जाण्याचा विषयच नाही. आता आणखी काय चर्चा करायची आहे. मराठा आरक्षणासाठी जे करता येईल, ते आम्ही करणार आहोत. त्यासाठी कुणी टीका करत त्याकडे मी लक्ष देत नाही. टीकाकारांना विनंती आहे त्यांनी आपला वेळ समाजासाठी द्यावा, असा टोला संभाजीराजे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना लगावला. उद्यनराजे यांनी संभाजीराजे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर संभाजीराजे यांनी नाव न घेता हा टोला लगावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या