Friday, April 26, 2024
Homeनगरऔरंगाबाद एसटी बसवर संभाजीनगरचे स्टीकर

औरंगाबाद एसटी बसवर संभाजीनगरचे स्टीकर

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-

औरंगाबादला जाणार्‍या एसटी बस वर छत्रपती संभाजीनगर नावाचे स्टीकर चिटकवून औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करावे या मागणीसाठी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपुरात आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

हिंदवी स्वराज्या रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव औरंगाबाद शहराला येत्या 26 जानेवारीपर्यंत देण्यात यावे. यासाठी श्रीरामपूर येथील एसटी बस स्थानकातील औरंगाबादकडे जाणार्‍या एसटी बसेसवर छत्रपती संभाजीनगर नावाचे फलक लावण्यात आले.

याप्रसंगी या नामांतराला विरोध करणार्‍या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री यांचा तीव्र शब्दात निषेध करून बाबा शिंदे म्हणाले, येत्या 26 जानेवारीपर्यंत औरंगाबाद शहराचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज नगर झाले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने संपूर्ण नगर जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. याची महाराष्ट्रातील आघाडी सरकारने औरंगाबाद महानगरपालिका येथील सत्ताधार्‍यांनी नोंद घ्यावी.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे ,जिल्हा सचिव तुषार(तात्या) बोबडे, जिल्हा सरचिटणीस डॉ. संजय नवथर, उपजिल्हाध्यक्ष सुरेश जगताप, शहराध्यक्ष गणेश दिवसे, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष विशाल शिरसाठ, शहर संघटक निलेश सोनवणे, तालुका सरचिटणीस गोरक्षनाथ येळे, शहर सरचिटणीस रोहित जोंजाळ, तालुकाध्यक्ष भास्कर सरोदे, कामगार सेनेचे नंदूभाऊ गंगावणे, विद्यार्थी सेना तालुका सचिव विकी राऊत, विद्यार्थी सेना तालुका संघटक आतुल तारडे, शहर उपाध्यक्ष बाबासाहेब भालेराव, लखन कडवे, ज्ञानेश्वर काळे, मृत्युंजय रुद्राक्ष ,विद्यार्थी सेना शहर सरचिटणीस संकेत शेलार, उपशहर अध्यक्ष रतन वर्मा, प्रमोद शिंदे, विभागाध्यक्ष मारुती शिंदे, बजरंग शिंदे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या