संभाजी स्टेडियम अंधारात

jalgaon-digital
1 Min Read

नवीन नाशिक l New Nashik (प्रतिनिधी) :

संभाजी स्टेडियम येथे खासदार हेमंत गोडसे यांच्या निधीतून नुतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे याठिकाणी असलेले पथदीप गेल्या कित्येक दिवसापासून बंद असल्याने सायंकाळी व रात्रीच्या वेळी मद्यपींचा वर टवाळखोरांच्या उपद्रवामुळे जॉगिंगला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसह महिलावर्गाला मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.

संभाजी स्टेडियम येथे पहाटे चार वाजेपासून ज्येष्ठ नागरिक, तरुण तसेच महिलावर्ग व्यायामासाठी येत असतात. येथील जॉगिंग ट्रॅकवर चालण्यासाठी सकाळी व सायंकाळी नागरीकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळलेली असते, अशातच गेल्या कित्येक महिन्यांपासून येथील पथदीप बंद अवस्थेत आहेत.

याठिकाणी असलेल्या पथदिपांना वीजपुरवठा करणारी वायर तुटल्याने याठिकाणी अंधाराचे साम्राज्य पसरलेले आहे.

संध्याकाळी व रात्रीच्या वेळी या ठिकाणी काही टवाळखोर तसेच मद्यपी येऊन दारू पिऊन येथे फिरावयास आलेल्या महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना त्रास देत असल्याचे प्रकार घडले आहेत.

अंबड पोलिसांनी याठिकाणी यापूर्वी कारवाई केली मात्र अंधाराचा फायदा घेत टवाळखोर येथून पोबारा करण्यास यशस्वी ठरले. मनपा विद्युत विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी परिसरातील महिला व जेष्ठ नागरिकांनी केली आहे.

याठिकाणी पथदीप बंद असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. लवकरच तात्पुरत्या स्वरूपात का होईना उपायोजना करण्यात येतील.

मोहन गीते, कनिष्ठ अभियंता, मनपा विद्युत विभाग नवीन नाशिक

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *