Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षण : मी संयमी, पण इथून पुढे तुम्ही संयम पाहणार नाहीत

मराठा आरक्षण : मी संयमी, पण इथून पुढे तुम्ही संयम पाहणार नाहीत

रायगड:

खासदार संभाजी छत्रपती यांनी रायगडावरून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. मी राजकारणी नाही, मी राजकारण करत नाही. आत्तापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला. हो आहे मी संयमी. पण इथून पुढे तुम्ही माझा संयम पाहणार नाहीत. मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. काय होईल ते होईल. म्हणून आम्ही ठरवल की आंदोलन हे निश्चित आहे”, अशा शब्दांत संभाजीराजे भोसले यांनी सरकारला सुनावले आहे. यावेळी येत्या १६ जूनला पहिला मोर्चा काढण्याचा इशारा खासदार संभाजीराजे भोसले यांनी दिला आहे.

- Advertisement -

३४८ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी ही भूमिका व्यक्त केली. यावेळी संभाजी राजे म्हणाले, मी राजकारणी नाही. राजकारण करत नाही. समाजावार अन्याय होत असेल तर न्याय देणं ही आमची भूमिका आहे. मराठा समाज वाईट परिस्थितीत आहे. त्यांच्यासाठी आवाज उठवायचा नाही का? सर्वांना आरक्षण आहे, मराठ्यांना नाही. मग मी आवाज उठवायचा नाही का? मराठा समाजावर अन्याय होत असेल तर सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

जे मी सांगितले तेच भोसले समितीच्या अहवालात

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी भोसले समिती स्थापन करण्यात आली. या समितीने अहवाल दिला आहे. काही शिफारशी केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच भोसले समितीने सांगितल्या आहेत. समितीने काही वेगळं सांगितलं नाही. मी सांगितलेल्या पाच मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करा, समाजाला वेठीस धरू नका, असं आवाहन त्यांनी केलं.

कोल्हापूरहून पहिला मोर्चा

“मला सांगायचंय की सध्या तुम्ही रस्त्यावर येऊ नका. पहिली जबाबदारी आमच्या लोकप्रतिनिधींची आहे. पहिला मोर्चा शाहू महाराजांच्या समाधीच्या ठिकाणाहून आमचा पहिला मोर्चा होणार आहे. लोकप्रतिनिधींनी सांगायला हवं की सकल मराठा समाजाला तुम्ही कसा न्याय देणार आहात. तेव्हाच बोलायचं. कोविड संपल्यानंतर देखील तु्म्ही ठोस पावलं उचलली नाहीत, तर संभाजीराजांसह संपूर्ण मराठा समाज मुंबईपर्यंत लाँग मार्च करणार. तिथे तुम्हाला लाठी मारायची असेल, तर पहिली लाठी संभाजी राजेला मारावी लागेल. छत्रपतींच्या वंशजावर पहिली लाठी मारावी लागेल. आम्हाला गृहीत धरू नका, एवढंच सांगतो”, असं देखील संभाजीराजे भोसले यावेळी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या