Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकसोशल मिडीयाच्या युगात आजही संबळ वाद्यावर ठेका

सोशल मिडीयाच्या युगात आजही संबळ वाद्यावर ठेका

लखमापूर । Lakhamapur

महाराष्ट्रात लोककला आजही जीवंत आहे. त्यात पारंपरिक पध्दतीने वाजविले जाणारे वाद्ये सुध्दा जीवंत आहे. त्यात ग्रामीण भागातील नागरिकांचा आत्मा म्हणून ज्या वाद्य्याकडे पाहिले जाते, ते म्हणजे संबळ वाद्ये आजही जीवंत आहे.

- Advertisement -

गोंधळ विधीनाट्यात वाजविले जाणारे प्रमुख वाद्य.कुळधर्म, कुलाचार म्हणून कुलदेवीच्या नावाने गोंधळ घालण्याची प्रथा संपूर्ण महाराष्ट्रात प्रचलित आहे. आणि याच गोंधळ विधीनाट्यात संबळ वाजविले जाते. या वाद्यास दुसरे नाव जोड समेळ असेही म्हणतात. भरतमुनी वर्गीकरणानुसार अवनध्द आणि कुर्ट सँक्स या अभ्यासकांच्या वाद्यशास्त्रीय वर्गीकरणानुसार कंपितपटल या प्रकारांत येणारे हे संबळ वाद्ये आहे. गोंधळ या विधिनाट्यातील संबळ हे वाद्ये महत्त्वाचे मानले जाते. कारण जेंव्हा संबळ वादक संबळ वाजवून रंगभूमी आणि आजुबाजुचा परिसर नाट्यमय, भक्तीमय करतो, तेव्हा मुख्य नायक सादरीकरणांला सुरुवात करतो. असा वादन संकेत आहे.

गोंधळात संबळ हे परंपरेने ठरलेले आणि प्राचीन असे वाद्ये आहे. संबळ या वाद्याच्या उत्पती माहिती सांगितली जाते. ती अशी महिषासुराचे दोन शिष्य चंड आणि मुंड द्यैत्य ज्यावेळी महिषासुरांचा देवीने वध केला.महिषासुरांचे हे शिष्य म्हणाले हे देवी तु मारण्याआधी तुझ्या कामी आमचा देह वाजवा .अशी आमची इच्छा आहे.म्हणून चंड मुंड द्यैत्याच्या शिर व कातड्यापासुन संबळ तयार केले गेले.व हे संबळ वाजुन देवीला शांत केले.संबळ या वाद्यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार केलेली असते.

संबळ हे वाद्ये तबल्याप्रमाणे दोन वाद्ये दोरीने एकमेकांना बांधलेले असते. तबल्याप्रमाणे एक लहान व एक मोठे अशी जोडी असते.ते दोरीने एकमेकांना बांधलेले असतात. दोन्ही एकसाथ वाजवली जातात त्याला जोडसमेळ असेही म्हणतात. संबळाची दोन्ही खोडे लाकडी असतात.एकाला चाटी व दुस-या धुमा म्हणतात. संबळ हे चर्म वाद्ये प्रकारात येते. हे प्रामुख्याने जागरण गोंधळ, वाजंत्री, तसेच कुलदैवताची पुजा करतांना हे वाद्ये वाजविले जाते. त्यामुळे संबळ हे वाद्ये आजही जिवंत स्वरूपात पाहायला मिळत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या