Friday, April 26, 2024
Homeनगरओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका

ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका

अहमदनगर-

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीेने ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी राज्य सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकिल नियुक्त करावा, तसेच ओबीसी कोट्याला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करण्यात आली.

- Advertisement -

समता परिषदेचे राज्य सरचिटणीस अंबादास गारुडकर, महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, प्रा.माणिक विधाते, जालिंदर बोरुडे, भरत गारुडकर, ब्रिजेश ताठे, गणेश शेलार, महेश गाडे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.

अंबादास गारुडकर म्हणाले, राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात दुबळ्या ओबीसींची न्याय बाजू मांडण्यासाठी देशातील नामवंत वकिलाींच फौज उभी करावी. मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करु नये तसे झाल्यास आधीच 52 टक्के असलेल्या ओबीसींच्या अवघ्या 17 टक्के जागा दिल्या आहेत आणि त्यातला 12 टक्के भरल्या आहेत अशा अवस्थेत मराठ्यांना ओबीसीत समावेश केल्यास त्यांनाही काही मिळणार नाही व परिणामी ओबीसींचेही नुकसान होईल. त्यासाठी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे.

सुभाष लोंढे, मच्छिंद्र गुलदगड, निखिल शेलार, बाळासाहेब भुजबळ, आनंद लहामगे, हरिभाऊ डोळसे, शरद झोडगे, भाऊ बोरुडे, भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, गणेश बनकर, रमेश सानप आदिंसह ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या