समता पतसंस्था कर्ज थकबाकीपोटी दिलेला चेक न वटल्याने आरोपीस कारावास

jalgaon-digital
1 Min Read

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

समता नागरी पतसंस्थेच्या अहमदनगर शाखेचे थकीत कर्जदार अब्दुल दौलत शेख यांनी अहमदनगर शाखेत कर्जाच्या थकबाकीपोटी दिलेला चेक न वटल्याने त्यांच्या विरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अ‍ॅक्ट कलम 138 अन्वये चिफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट अहमदनगर यांच्या कोर्टात शाखाधिकारी एन.जी.गुंजाळ यांनी फिर्याद दाखल केली होती.

कोर्टाने आरोपीस दोषी धरून 1 महिना कारावास व 45 हजार रुपये दंड दोन महिन्यांच्या आत समता पतसंस्थेच्या अहमदनगर शाखेत फिर्यादी गुंजाळ यांच्याकडे देण्याचा आदेश पारित केला आहे. समता पतसंस्थेतर्फे अ‍ॅड. वृषाली तांदळे यांनी काम पाहिले.

महाराष्ट्र सहकारी संस्था कलम 101 व 156 अन्वये तसेच फौजदारी कायद्याप्रमाणे व निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट क्ट कलम 138 अन्वये थकबाकी वसुली करणे कामी कठोर व कायदेशीर कारवाई थकबाकीदार, कर्जदार व त्यांचे जामिनदार यांचे विरूद्ध केली जाते, असे विशेष वसुली व विक्री अधिकारी जनार्दन कदम यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *