Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात झळकले सामनाच्या अग्रलेखाचे पोस्टर; भाजपचे पदाधिकारी पोलीस आयुक्तालयात

नाशकात झळकले सामनाच्या अग्रलेखाचे पोस्टर; भाजपचे पदाधिकारी पोलीस आयुक्तालयात

नाशिक | प्रतिनिधी Nashik

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Udhav Thakaray) यांच्याविषयी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) आक्षेपार्ह विधान केल्यानंतर काल (दि २४) रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर गोंधळ उडाला होता. राणेंच्या अटकेची ठिणगी पडली ती नाशिकमधूनच. नाशिकमध्ये पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल झाला आणि एक पथकही राणेंच्या अटकेसाठी धाडण्यात आले होते….

- Advertisement -

यानंतर सर्वांच्याच नजरा खिळून होत्या त्या आजच्या सामनाच्या अग्रलेखाकडे. आज सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आणि अग्र्लेखावरील बातम्या सर्वत्र प्रसिद्ध झाल्या. यानंतर अनेक टीका टिपण्णीदेखील झाली. हे सर्वकाही सुरु असतानाच या अग्रलेखाचे पोस्टर चक्क नाशिक मध्यच्या भाजप आमदार आमदार देवयानी फरांदे यांच्या घराकडे जाणाऱ्या चौकात शिवसेनेचे नेते अजय बोरस्ते यांनी लावल्यामुळे हा वादाचा विषय होण्याची दाट शक्यता आहे.

आज सामनाच्या अग्रलेखातून राऊत यांनी नारायण राणेंना नको-नको त्या उपमा देत त्यांच्यावर हल्ला चढवला आहे. आजच्या अग्रलेखात त्यांनी राणेंना 5 उपमा दिल्यात. भोकं पडलेला फुगा, बेडूक, छपरी गँगस्टर, उपटसुंभ, सरडा अशा उपमा देत त्यांनी राणेंवर प्रहार केला.

दरम्यान, ज्या ठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहे तिथे पोलीसही दाखल झाले होते. त्यांनी हे वादग्रस्त पोस्टर काढण्यास सांगितल्यानंतर शिवसेनेच्या बोरस्ते यांनी नारायण राणे कोण आहेत हे जनतेला समजू द्या असे सांगत पोस्टर उतरविण्यास नकार दिला. यानंतर पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दुसरीकडे भाजपच्या नगरसेवकांनी मोट बांधली असून ते पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल होणार असल्याचे समजते आहे.

काल झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर सव्वाशे जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये शंभर भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले असून त्याबद्दल भाजपचे पदाधिकारी तीन आमदार आणि यांच्यासह 66 नगरसेवकांचा शिष्टमंडळ पोलीस आयुक्तालयात दाखल झाले आहे. या ठिकाणी पोलीस आयुक्तांना देण्यात येणाऱ्या निवेदनात जे गुन्हे सेनेच्या कार्यकर्त्यांवर दाखल केले आहेत तेच गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या