Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकसमाजवादी, एमआयएमची मनपा निवडणुकीत उडी

समाजवादी, एमआयएमची मनपा निवडणुकीत उडी

नाशिक । प्रतीनिधी Nashik

नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी Upcoming NMC Election आता फक्त काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचप्रमाणे काही पक्षांनी देखील निवडणुकीत उतरण्याची तयारी सुरू केली आहे, यामध्ये समाजवादी पार्टी Samajwadi Party तसेच एमआयएम MIM पक्षांचा समावेश आहे.

- Advertisement -

मुस्लीम तसेच दलित मतांवर विशेष लक्ष असलेल्या या दोन्ही पक्षाचे नेते सध्या निवडणुकीच्या तयारीत लागल्याचे दिसत आहे.नाशिक शहरातील मुस्लिम, दलित समाजाकडे या पक्षांची नजर आहे. मध्य नाशिक, सातपूर व नाशिकरोड आदी भागात या पक्षांचे उमेदवार राहणार असल्याचे म्हटले जात आहे. समाजवादी पार्टीच्या वतीने मुशीर सय्यद तसेच शेख सलीम अब्बास हे नगरसेवक म्हणून महापालिकेत गेलेले आहे, मात्र या नंतर समाजवादी पक्षाकडून कोणीही नगरसेवक म्हणून महापालिकेत गेलेला नाही. तर एमआयएम पक्षाचे वतीने देखील निवडणुकीत उतरण्याची तयारी सुरू केली आहे.

एमआयएमने नव्याने नाशिकला शहराध्यक्ष दिले असून यामुळे मागील काही काळात पक्षसंघटन देखील मजबूत होतांना दिसत आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम अध्यक्ष खा. असादुद्दीन ओवेसी यांची सभा देखील नाशिकमध्ये होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान मुस्लीम तसेच दलित मतांवर राजकारण करणार्‍या एमआयएम पक्ष किती जागा लढवणार किंवा कोणाबरोबर जाणार याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे समजते.

मात्र यंदा पक्षाच्या वतीने महापालिका निवडणूक लढण्याचा निर्धार करण्यात आला आहे. दुसरीकडे उत्तर भारतीय तसेच मुस्लीम व दलित समाजाच्या मतांवर नजर असलेल्या समाजवादी पक्षाने देखील यंदाची महापालिका निवडणूक लढण्याची जोरदार तयारी केली आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा समाजवादी पक्ष प्रमुख अखिलेश यादव यांची नाशिक मध्ये सभा घेण्यावर चर्चा सुरू असल्याचे समजते आहे. मोठ्या पक्षातील दिग्गज उमेदवारांसमोर छोट्या पक्षातील उमेदवार कडवे आव्हान उभे करू शकतात, असा आजवरचा अनुभव आहे, तसेच राजकारणात कोणत्याही प्रकारची कमतरता ठेवण्यात येत नाही. यामुळे ऐनवेळेपर्यंत काय होतो हे सांगणे कठीण असले तरी समाजवादी पार्टी तसेच एमआयएम पक्ष नाशिक महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागल्याचे दिसत आहे.

समाजवादीचे नाशिक शहर अध्यक्ष इम्रान चौधरी हे मूळचे उत्तर भारतीय असून जिप्सम असोसिएशनचे ते नाशिक जिल्हा संस्थापक अध्यक्ष आहे. त्यामुळे त्यांचे उत्तर भारतीयांमध्ये चांगला संपर्क असून शहरात इतर समाजाच्या लोकांमध्ये देखील चांगले संबंध आहेत. नाशिक जिल्हा अध्यक्ष रफिक सय्यद हे मूळचे नाशिकचे आहे. त्याचप्रमाणे मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

मागील सुमारे पंचवीस वर्षापासून रफीक सय्यद यांनी विविध सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षाच्या माध्यमातून भरीव कार्य केले आहे. यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत या दोघांचे अनुभव पक्षाच्या उमेदवारांसाठी उपयोगी ठरणार आहे. त्याचप्रमाणे एमआयएम पक्षाने नाशिक शहर अध्यक्ष पदी नेमणूक केलेल्या अहमद काजी यांचीदेखील सामाजिक व राजकीय कारकीर्द मोठी आहे. तरुण व तडफदार असा नेतृत्व असलेल्या काजी यांच्यावर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर नाशिक मधील संघटन मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विविध प्रकारचे उपक्रम व संघटन बांधणी वर काजी यांचे लक्ष राहते. त्याचप्रमाणे युवा शहराध्यक्ष रमजान पठाण, मुखतार शेख व इतर पदाधिकारी देखील संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या