Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याशोकाकुल वातावरणात स्वामी सागरानंद महाराजांना समाधी

शोकाकुल वातावरणात स्वामी सागरानंद महाराजांना समाधी

त्र्यंबकेश्वर । वार्ताहर Trimbakeshwar

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि आनंद आखाड्याचे प्रमुख स्वामी सागरानंद सरस्वती (Swami Sagarand Saraswati) यांचे आज पहाटे वृद्धपकाळाने निधन झाले.

- Advertisement -

आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथील गणपतबारी परिसरात असणाऱ्या सागरानंद आश्रमात जाऊन सागरानंद सरस्वतींचे अंत्यदर्शन घेत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्यासोबत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनीही दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

ब्रह्मलीन स्वामी सागरानंद महाराज यांची अंत्ययात्रा सागरानंद आश्रम गणपत बारीतून त्र्यंबकेश्वर मंदिर चौक, कुशावर्त चौक , मार्गे तेली गल्ली रिंग रोड मार्गे आनंद आखड्यात आली.मोठ्या प्रमाणावर साधू आणि भाविक, आश्रमाचे भक्त अंतयात्रेत सामील झाले होते. स्वामी सागरानंद महाराज यांना गजलक्ष्मी माता मंदिर आनंद आखाडा येथे सायंकाळी सव्वा सहा वाजता रिती परंपरेनुसार समाधी देण्यात आली. नागरिकांनी अर्धा दिवस दुकाने बंद ठेवून व्यवहार बंद ठेवून दुःखवटा पाळला.

यावेळी आनंद आखाड्याचे शंकरानंद सरस्वती (अखिल भारतीय आखाडा परिषदेवर सचिव ). गणेशानंद सरस्वती अनंत विभूषित जगद्गुरू सूर्याचार्य कृष्णदेवनंदगिरीजी महाराज पीठाधीश्वर सूर्य पीठ गुरुस्थान माऊली आश्रम द्वारका मुंबई तसेच श्री पंचदशनाम जुना आखाडा महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज. रामानंद सरस्वती (ब्रह्मदर्शन आश्रम). महंत ब्रह्मगिरी महाराज अंजनेरी , अटल आखाडा ठाणा पती महंत उदयगिरी महाराज, श्रीराम शक्ती पिठाचे महामंडलेश्वर सोमेश्वरानंद सरस्वती महाराज, महामंडलेश्वर अनिकेत शास्त्री देशपांडे महाराज, स्वामी गिरिजानंद सरस्वती, सर्वनंद सरस्वती, केशवानंद सरस्वती रामानंमाजी नगराध्यक्ष कैलास घुले विद्यमान नगर अध्यक्ष पुरुषोत्तम लोहगवकर त्र्यंबक मंदिर विश्वस्त भूषण आडसरे तसेच सुरेश गंगापुत्र आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या