Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकमहान व्यक्तिमत्वास सलाम; नाशिककरांनी जागवल्या आठवणी

महान व्यक्तिमत्वास सलाम; नाशिककरांनी जागवल्या आठवणी

नाशिक । प्रतिनिधी

भारतीय क्रीडा क्षेत्रात आपली अभूतपूर्व छाप उमटवणारे धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन झाले. भारताला खेळाचे स्वप्न दाखवणारा अवलिया आज जग सोडून गेल्याने सर्वत्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

- Advertisement -

नाशिकमध्येही मिल्खा सिंग आले होते. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अनेकांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.अलिकडेच ते नाशिक शहरात होणार्या मविप्र मॅरथॉनमध्येही पाहूणे म्हणून आले होते. यावेळीही त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले होते.मिल्खा सिंग नाशिकमध्ये आल्याची वार्ता पसरल्यानंतर मोठ्या संख्येने नाशिककरांनी त्यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती.

प्रतिकूल परिस्थितीनेच घडलो

मॅरथॉनच्या उद्घाटनासाठी मिल्खा सिंग नाशिकमध्ये आले होते. मी किती प्रतिकुल परिस्थितीतून घडलो आहे, याबाबतचे मार्गदर्शन केले. खेळाडूंना त्यांनी सातत्य किती महत्वाचे असते यावर मार्गदर्शन त्यांनी केले. यशस्वी व्हायचे असेल तर कष्ट केल्याशिवास पर्याय नाही तसेच आहार कसा असला पाहिजे या विषयावरदेखील मार्गदर्शन त्यांनी केले होते.

-नीलिमा पवार, सरचिटणीस, मविप्र समाज

मेहनत करा फळ मिळते

पाच सहा वर्षांपुर्वी मिल्खा सिंग मला दिल्ली विमानतळावर भेटले होते. तीन-चार मिनिटे माझं बोलणं त्यांच्याशी झालं. त्यांच्या बोलण्यात प्रचंड आत्मविश्वास होता. त्यांना त्यांच्या यशाबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, कुठलेही काम तुम्ही करा. यामध्ये मेहनत असली पाहिजे, मेहनत करणारी व्यक्ती कधीच अपयशी होत नाही. त्यांचे पहिले इम्प्रेशन माझ्यासाठी खास होते, मी आजही ते पाळतो.

– प्रफुल्ल बरडिया, सी.ए. नाशिक

अविस्मरणीय क्षण

चंढीगड येथे आमची भेट झाली होती. त्यांच्या पत्नीही त्यांच्यासोबत होत्या. आम्ही त्यांना ओळख सांगितली. त्यानंतर त्यांनी मनमोकळ्या गप्पा आमच्याशी केल्या. मी स्पोर्टस्मध्ये असून माझे दोन्ही मुलेदेखील स्पोर्टस्मध्ये असल्याचे जेव्हा त्यांना सांगितले तेव्हा त्यांना प्रचंड आनंद झाला होता. चांगलं काम करा, खुप कष्ट करा असे त्यांनी सांगितले.

– रवींद्र सिंगल, पोलीस अधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या