सारंगखेड्यात 180 घोड्यांची विक्री, 1 कोटीची उलाढाल

jalgaon-digital
2 Min Read

सारंगखेडा Sarangkheda । वार्ताहर-

अश्व बाजाराने (Horse market) एक कोटीचा आकडा पार केला आहे. आतापर्यंत 180 घोडयांची विक्री (Sale) झाली असून त्यातून 1 कोटी 5 लाखाची उलाढाल (Turnover) झाली आहे.

यंदा घोडेबाजारात एकूण बाराशे घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. गेल्या वर्षात कोरोनामुळे बंद असलेल्या घोडेबाजाराला यंदा शासनाने परवानगी दिल्याने सुरुवात झाली आहे. घोडे बाजाराच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 180 घोड्यांची विक्री झाली आहे. अश्व बाजारात खरेदी विक्रीचा व्यवहारात जोमाने वाढ होताना दिसत आहे. त्यात सर्वात महागडा घोडा 11 लाख रुपयांचा नुकरा प्रजातीचा घोडा विकण्यात आला आहे. तो कोल्हापूर जिल्ह्यातील बाळू मामा मठ मंदिर विश्वस्तांनी खरेदी केला आहे. घोडे बाजारात एकूण बाराशे घोड्याची आवक झाली आहे. आतापर्यंत 180 घोड्यांची विक्री झाली आहे, अशी माहिती कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी यांनी दिली.

कोट्यावधी रुपयांचे, लख लख चंदेरी व सोनेरी रूप प्राप्त असलेले अश्व या अश्वनगरीत सामील झाले आहेत. या घोड्यांची किंमत कोटींच्या घरात आहे. हे कोट्यवधी रुपयांचे घोडे घोड्यांच्या स्पर्धेचे सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. घोडे बाजारात अश्व सौंदर्य स्पर्धा व अश्वप्रदर्शनसारख्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्पर्धांसाठी घोडे व्यापारी लाखो करोडोच्या घोड्यानं प्रशिक्षण देत आहेत. त्यांची चाल, उंची, रंग, डोळे, पंचकल्याण, देवमन कंठ, मान, पाय या सगळ्यांचे बारिकीने निरीक्षण करण्यात येत असते त्या अनुषंगाने घोडे व्यापारी व मालक घोड्याना महत्वपूर्ण प्रशिक्षण देण्यात व्यस्त आहेत. अश्व सौंदर्य स्पर्धेमध्ये प्रामुख्याने राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब या राज्यांचा समावेश आहे.

एक लाखाहून अधिक अशवप्रेमीची घोडे बाजाराला भेट

गेल्या वर्षी कोरोनाने भयंकर रौद्ररुप धारण केले होते. त्या कारणास्तव घोडे बाजार रद्द करण्यात आला होता. यंदा शासनाने कोविड 19 च्या अटी शर्थींवर परवानगी दिली आहे. भारतात अश्वप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. आतापर्यंत घोडेबाजारात 1 लाखाहून अधिक अश्वप्रेमीनी घोडे बाजाराला भेट दिली आहे, अशी माहिती चेतक फेस्टिवलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *